Himachal Pradesh Rain: उत्तर भारतात मुसळधार पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच पुरात प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रुस्लान मुमताज मनालीमध्ये अडकला होता. अखेर तीन दिवसांनी तो तिथून सुखरुप बाहेर पडला आहे. त्याने इन्स्टाग्रामवरून याबद्दल माहिती दिली आहे.

HP Rain: पुरामुळे मनालीत अडकला प्रसिद्ध अभिनेता; व्हिडीओ शेअर करत दाखवली भयंकर परिस्थिती, म्हणाला, “घरी परतण्याचा…”

“मी मनालीमध्ये नेटवर्कशिवाय अडकून पडेन, रस्ते बंद असल्यामुळे घरी परतण्याचा कोणताही मार्ग नाही आणि मी शूटिंग करू शकत नाही, अशा परिस्थितीची मी कल्पनाही केली नव्हती. अतिशय सुंदर ठिकाणी इतकी वाईट परिस्थिती उद्भवली आहे. मी आनंदी व्हावं, दुःखी व्हावं, आभार मानावे, कृतज्ञता व्यक्त करावी की फक्त सफरचंदाचा आनंद घ्यावा, हेही मला कळत नाहीये,” असं रुस्लानने दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. आता तो हिमाचल प्रदेशमधून मुंबईला येण्यासाठी निघाला आहे. “या नदीमुळे सगळं घडलंय, मला जीवनदान दिल्याबद्दल खूप आभार,” असं त्याने पुराचा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय. तसेच त्याने विमानात बसून ‘टेक ऑफ’ कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे.

रुस्लान मुमताजची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, रुस्लान मुमताज मनालीमध्ये एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी गेला होता. त्याचदरम्यान तो मुसळधार पाऊस व पुरामुळे अडकला. रुस्लानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शहरातील पुराची परिस्थिती दाखवली होती. दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये अद्यापही मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.