Shashank Ketkar Daughter Photos : अभिनेता शशांक केतकरने भाऊबीजेच्या दिवशी लेकीचा चेहरा दाखवला आहे. शशांक केतकर यावर्षी जानेवारी महिन्यात बाबा झाला. शशांकची लेक राधा ९ महिन्यांची झाली आहे. त्याने मोठा मुलगा ऋग्वेद व मुलगी राधा यांचे क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

शशांक केतकरने ४ फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी दोन फोटो ऋग्वेद व राधाचे आहेत. फोटोंमध्ये चिमुकल्या ऋग्वेदने त्याच्या बहिणीला मांडीवर घेतलं आहे. इतर दोन फोटोंमध्ये प्रियांका व शशांक दोन्ही मुलांबरोबर पोज देत आहेत.

आनंदाचे झाड दारी झुलते डहाळी…
केतकर कुटुंबाकडून दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा, असं कॅप्शन देत शशांक केतकरने हे फोटो शेअर केले आहेत.

पाहा पोस्ट-

शशांक केतकरने मुलीचे फोटो शेअर केल्यानंतर मराठी सेलिब्रिटी व चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तितिक्षा तावडे, नंदिता पाटकर, आशुतोष गोखले यांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. मयुरी देशमुखने राधा किती गोड आहे, अशी कमेंट केली आहे.

‘मस्तच.. गोड राधा शशांक कार्बन कॉपी आणि ऋग्वेद दादा प्रियांकाची कार्बन कॉपी.. तुम्हाला कोणाची नजर ना लागो,’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. ‘किती गोड “रुरा” दोघेही खूपच गोड आहेत, खूप छान आणि गोड कुटुंब आहे या कुटुंबाला कोणाची नजर ना लागो,’ ‘किती गोड क्युट कुटुंब आहे, दिवाळीचं खुपचं सुंदर गिफ्ट मिळालंय आम्हाला शशांक खूप खूप शुभेच्छा.. ‘मनापासून आशीर्वाद.. चिमुकल्यांना खूप प्रेम,’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

शशांक केतकरने तेजश्री प्रधानपासून घटस्फोट घेतल्यावर ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेशी लग्न केलं. शशांक व प्रियांका यांनी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद असं आहे. यंदा शशांक प्रियांकाने दुसऱ्या बाळाचं म्हणजेच लेक राधाचं स्वागत केलं आणि त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं.