सिद्धार्थ जाधवने मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतदेखील त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तो नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. त्याच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तो अनेकदा चर्चेत असतो. आता त्याने त्याच्या कॉलेजच्या दिवसांमधील एक आठवण शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “माकड दिसतोय…,” नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेला सिद्धार्थ जाधवचं चोख उत्तर; म्हणाला…

सिद्धार्थ नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. इतकंच नाही तर विविध मुलाखतींमधून देखील तो त्याच्या आयुष्यातील गुपित सर्वांसमोर आणत असतो. तर तो कॉलेजमध्ये असताना एका मुलीला त्याने गुलाब दिलं होतं तो किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा : “दिसणं, रोमान्स…”, सिद्धार्थ जाधवने उघड केलं त्याच्या क्रशचं नाव, जाणून घ्या कोण आहे ती?

कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तो जुन्या आठवणी शेअर करताना म्हणाला, “आपल्या सर्वांच्या कॉलेजमध्ये डेज असतात. रोझ डे, ट्रेडिशनल डे असे… तर रोझ डे ला मला तर कोणी गुलाब देणार नाही. एकदा मी एकीला गुलाब द्यायला गेलो तर ती मला म्हणाली की ठेव तुझ्याकडेच. असं म्हणत तिने तो गुलाब ठेवून दिला. माझे गुलाब कोणी घेतले नाहीत.” तर आता त्याने सांगितलेला हा मजेशीर किस्सा चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor siddharth jadhav shares his college days memory with his fans rnv