छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीमध्ये ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचे नाव गेली अनेक वर्षं सामील आहे. आता लवकरच या कार्यक्रमाचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ९ ऑगस्ट पासून ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ सुरू होणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित झाला. तर आता या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाची भूमिका कोण बजावणार हे समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सारेगमप’ या कार्यक्रमाच्या नवीन पर्वाचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. त्या प्रोमोतून या कार्यक्रमाचं परीक्षण कोण करणार हे समोर आलं होतं. संगीत दिग्दर्शक, गायक सलील कुलकर्णी आणि बॉलीवूडमधील आघाडीच्या गायकांपैकी एक मराठमोळी गायिका वैशाली भैसने-माडे सांभाळताना दिसणार आहेत. तर या दोघांबरोबरच या पर्वात सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत बघायला मिळणार आहेत. पण त्या प्रोमोमध्ये या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कोण दिसणार हे दाखवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे प्रेक्षकांना ते जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. आता ते गुपित उलगडलं गेलं आहे.

आणखी वाचा : गाण्याबरोबरच शिक्षणातही पुढे! प्रथमेश-मुग्धाची शैक्षणिक पार्श्वभूमी माहीत आहे? घ्या जाणून

हेही वाचा : ठरलं! ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं परीक्षण करणार बॉलीवूडमधील ‘ही’ आघाडीची गायिका, परीक्षकांची नावं समोर

या कार्यक्रमाचा पर्व प्रोमो नुकताच समोर आला. या नवीन प्रोमोमध्ये या आगामी परवाच्या सूत्रसंचालकाची झलक दिसली. त्यानुसार या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करणार आहे. मृण्मयीने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या आधीच्या पर्वाचंही सूत्रसंचालन केलं होतं. तिच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा तिला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress mrunmayee deshpande will be doing anchoring of upcoming season of saregamapa rnv