मालिका विश्वात दररोज नवीन घडामोडी घडत असतात. माझी तुझी रेशीमगाठ’ या झी वाहिनीवरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील यश-नेहाची जोडी आणि परीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. सध्या मालिकेत एक वेगळा ट्रॅक सुरु आहे. यश आणि नेहाच्या गाडीला अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.या जीवघेण्या संकटातून यश तर बचावतो. मात्र नेहा अजूनही बेपत्ता असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
मालिकेत असं दाखवलं आहे की नेहाचा सगळे शोध घेत आहेत मात्र ती कुठेच सापडत नाही. अखेर नव्या भागात तिला मृत म्हणून घोषित करण्यात आले आहे. मालिकेतील या कथानकामुळे प्रेक्षक नाखुश असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणूनच कदाचित आता मालिकेत नेहाची एंट्री होणार आहे. एका नव्या रूपात ती आपल्याला दिसणार अशी शक्यता आहे. याबाबत झी वाहिनीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहाचे म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे नव्या रुपातले फोटो शेअर केले आहेत. त्यावर कॅप्शन दिला आहे ही ‘नेहा की दुसरी कोण’? या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
चित्रपटाच्या अपयशाबद्दल बोलताना परिणीती म्हणाली, “बॉक्स ऑफिसवरची कमाई ही… “
प्रार्थना बेहरेने ही नुकतीच ‘बस बाई बस’ या कार्यक्रम सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. तिच्या हसण्यापासून ते वैभव तत्त्ववादी बरोबरच्या लग्नाच्या चर्चांवर तिने स्पष्टीकरण दिले आहे. प्रार्थनाने अभिषेक जावकरशी २०१७ साली लग्नगाठ बांधली. प्रार्थना मूळची बडोद्याची आहे, अभिनयात करियर करण्यासाठी तिने मुंबई गाठली.
प्रार्थना ही झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची देखील अधिक पसंती मिळत आहे. तिच्या भूमिकेचे कौतूक होत आहे. म्हणूनच कदाचित मालिकेत तिला नव्या रुपात प्रेक्षकांपुढे आणतील अशी शक्यता आहे. येत्या काही दिवसात हे आपल्यासमोर येईलच.