अभिनेत्री विशाखा सुभेदार हिला कायमच विनोदी भूमिकांसाठी ओळखलं जातं. विशाखा सुभेदारने ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील तिच्या कामाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. काही महिन्यांपूर्वी तिने या शोमधून एक्झिट घेतली आणि आता ती मालिकेमध्ये झळकत आहे. ती काम करत असलेल्या मालिकेला एका नेटकऱ्याने कमेंट करत वाईट असं म्हटलं. आता त्यावर विशाखा सुभेदारने दिलेलं उत्तर खूप चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशाखा सुभेदार सध्या स्टार प्रवाहवरील ‘शुभमंगल’ या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या या मालिकेत विशाखा सुभेदारबरोबर मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या शूटिंग दरम्यानच्या गमतीजमती विशाखा सुभेदार सोशल मीडियावरून शेअर करत असते. आता मृणाल देशपांडेबरोबर तिने एका गाण्यावर डान्स करतानाचं रील पोस्ट केलं.

आणखी वाचा : “नशिबात असेल तर…” विशाखा सुभेदारच्या चाहत्याने व्यक्त केली अनोखी इच्छा, अभिनेत्रीची कमेंट चर्चेत

या व्हिडीओमध्ये त्यांनी ढोलकीच्या तालावर या गाण्यावर ताल धरला आहे. त्यांचा हा डान्स पाहून सर्वच जण त्यांचं कौतुक करत आहेत. या रीलवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचा हा डान्स आवडल्याचं सांगितलं. यावर एका नेटकऱ्याने कमेंट केली की, “तुमच्या नृत्यात काय सहजता आहे! नवीन मालिका खुपच वाईट आणि बिनडोक….. वेगळं काही करण्याच्या नादात वाईट काम करू नका.” या कमेंटवर उत्तर देत विशाखा सुभेदारने लिहिलं, “वाईट काम निश्चित नाही करणार.. बाकी गोष्ट आणि संवाद लिहिणारे चॅनेल trp सगळे ठरवत असतं.. आपण आपलं काम प्रामाणिक करायचं.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या प्रेक्षकांना धक्का, विशाखा सुभेदारचा कार्यक्रमाला कायमचा रामराम

तिच्या या उत्तराकडे सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. या कमेंटवर इतक्या शांतपणे आणि सहजतेने उत्तर दिल्याबद्दल नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress vishakha subhedar gave reply to netizen who said her serial is very bad rnv