Aishwarya- Avinash Narkar : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी कायम चर्चेत असते. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये नारकर जोडप्याने आपला ठसा उमटवला आहे. हे दोघे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विविध ट्रेडिंग गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवून हे दोघेही प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.
सध्या सोशल मीडियावर जुन्या गाण्यांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. फेसुबक, इन्स्टाग्रामवर सध्या अनेक जुनी गाणी व्हायरल होत आहेत. १९६५ मध्ये ‘केला इशारा जाता जाता’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामधील ‘हिशोब सांगते ऐका भाओजी, कसा खरचला पैका!’ हे गाणं आजही सर्वत्र लोकप्रिय आहे. याच मराठी गाण्यावर ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी ठेका धरला आहे.
हेही वाचा : “ती स्ट्राँग आहे”, वैभव चव्हाणचं आर्याबद्दल वक्तव्य; निक्कीबरोबर घडलेल्या ‘त्या’ घटनेविषयी म्हणाला, “तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर…”
ऐश्वर्या व अविनाश यांचा या व्हिडीओमध्ये मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसून, पदर खोचून या गाण्यावर व्हिडीओ बनवला आहे. तर, अविनाश नारकरांनी सदरा घालून डोक्यावर टोपी असा मराठमोळा लूक करत ऐश्वर्या यांना जबरदस्त साथ दिली आहे. या व्हिडीओला अभिनेत्रीने “हिशोब…” असं कॅप्शन दिलं आहे.
नारकर जोडप्याच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव
ऐश्वर्या व अविनाश ( Aishwarya- Avinash Narkar ) यांचा हा मराठमोळा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या व्हिडीओला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. तितीक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरेने या व्हिडीओवर “कडक…” अशी कमेंट केली आहे. तर, अश्विनी कासारने या व्हिडीओवर कमेंट करत “क्या बात…” म्हटलं आहे. याशिवाय अन्य काही नेटकऱ्यांनी “ढोलकी टायमिंग कमाल”, “सरांनी ढोलकीवर एकदम मस्त ताल धरलाय”, “खूप सुंदर… मला तुमच्या दोघांच्या reels खूप आवडतात, त्यात हे गाणं मला खूपच आवडतं” अशा प्रतिक्रिया दोघांच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, दोघांच्या ( Aishwarya- Avinash Narkar ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या ‘झी मराठी’वरील मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. डॉ. मैथिली सेनगुप्ता यांच्या रुपात काही दिवसांपूर्वीच त्यांनी या मालिकेत रिएन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय अविनाश नारकर नुकतेच ‘डंका’ चित्रपटात झळकले होते.
© IE Online Media Services (P) Ltd