Aishwarya And Avinash Narkar : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी विविध ट्रेडिंग गाण्यांवर व्हिडीओ बनवत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. दोघंही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. ऐश्वर्या व अविनाश यांच्याकडे मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून पाहिलं जातं. दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी कलाविश्वापासून, बॉलीवूड ते अगदी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गाण्यांवर हे दोघंही रील व्हिडीओ बनवत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या व अविनाश त्यांच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये मनसोक्त डान्स करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र, आता काहीसा वेगळा व रोमँटिक अंदाज असणारा व्हिडीओ या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘ये रातें ये मौसम…’ हे काही वर्षांपूर्वीचं जुनं गाणं लोकप्रिय गायक सनमने रिक्रिएट केलं होतं. हे मूळ गाणं आशा भोसले व किशोर कुमार यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे. आज एवढ्या वर्षांनंतरही या सहाबहार गाण्याची लोकप्रियता प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. यावर आता नारकर जोडप्याने ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांनीही या व्हिडीओला ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फिल्टर जोडला आहे. नारकर जोडप्याचा हा रोमँटिक अंदाज प्रत्येकाच्या पसंतीस उतरत आहे.

हेही वाचा : Video : कॅमेरे पाहताच खुदकन हसली अन्…; रणबीर- आलियाच्या लेकीचा गोड अंदाज! राहाला पाहून नेटकरी म्हणाले…

जुन्या गाण्यावर ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा रोमँटिक अंदाज

ऐश्वर्या व अविनाश नारकर ( Aishwarya And Avinash Narkar ) नेहमीच ट्रेडिंग गाण्यांवर जबरदस्त डान्स करून सर्वांचं लक्ष वेधून घेतात. परंतु, यावेळी या जोडप्याने डान्स न करता त्यांच्या रोमँटिक अदाकारीने सर्वांचं मन जिंकलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या यांनी कॅप्शनमध्ये ‘कपलगोल्स’, ‘हॅपी लाइफ’ असे हॅशटॅग वापरले आहेत.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या या जुन्या गाण्यावरील व्हिडीओची नेटकऱ्यांना देखील भुरळ पडली आहे. “आवडतं गाणं व आवडती जोडी”, “सुपर रोमँटिक”, “तुमची जोडी अन् तुम्ही दोघंही एक नंबर आहात” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या नारकर जोडप्याच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : मिसेस कपूर होण्याआधी आलियाने सोडलेली ‘ती’ सवय; रणबीर कपूरने बायकोबद्दल केला खुलासा; म्हणाला, “वयाची ३० वर्षे…”

ऐश्वर्या व अविनाश नारकर ( Aishwarya And Avinash Narkar )

दरम्यान, दोघांच्या ( Aishwarya And Avinash Narkar ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर ऐश्वर्या सध्या ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहेत. तर अविनाश नारकर यांच्या ‘कन्यादान’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. याशिवाय अलीकडेच ते ‘डंका’ या मराठी चित्रपटात सुद्धा झळकले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya and avinash narkar shared black and white reels on old song watch now sva 00