Aishwarya Narkar : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे मराठी कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या जोडप्याने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. संसार सांभाळून सिनेविश्वात या दोघांनीही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या व अविनाश यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव अमेय नारकर असं आहे. अमेय गेल्या काही महिन्यांपासून त्याचं उच्च शिक्षण परदेशात पूर्ण करत होता. नुकताच तो भारतात परतला आहे.

अमेय भारतात परतल्यावर एअरपोर्टवर त्याच्या स्वागतासाठी अभिनेत्री ईशा संजय पोहोचली होती. ईशा सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सूर्या दादाच्या बहिणीची म्हणजेच राजश्रीची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी ‘आस्क मी सेशन’मध्ये ईशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला होता. यावरून ईशा सध्या अमेय नारकरला डेट करत असल्याचं स्पष्ट झालं होतं.

आता ईशा संजयने अमेयची आई म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांबरोबर शेअर केलेल्या एका गोड व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मिरर सेल्फी व्हिडीओला ईशाने “तुम हो कमाल, तुम बेमिसाल, तुम लाजवाब हो आयशा” हे गाणं लावलं आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकरांना टॅग करून ईशाने “Louuu ( लव्ह यू )” असं कॅप्शन दिलं आहे.

अमेय आणि ईशा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ईशाने त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय ईशा, ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या अनेक व्हिडीओवर कमेंट्स देखील करत असते.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/06/narkar.mp4

आस्क मी सेशनमध्ये केलेला खुलासा…

ईशाला एका नेटकऱ्याने “तुझं लग्न झालंय का दीदी?” असा प्रश्न विचारला होता. यावर अभिनेत्रीने अमेय नारकरबरोबरचा फोटो शेअर करत नेटकऱ्याला, “लग्न नाही झालंय कारण, कोणीतरी खूप दूर आहे सध्या” असं उत्तर दिलं होतं. यामुळे दोघंही लाँग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये आहेत हे स्पष्ट झालं होतं. मात्र, सध्या अमेय भारतात परतला आहे.