बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा जलवा अजूनही कायम आहे. त्यांना ही नावं आणि प्रसिद्धी इतक्या सहजासहजी मिळाली नाही. बिग बींना करिअरच्या सुरुवातीपासूनच खूप संघर्ष करावा लागला. या सिनेसृष्टीत त्यांना जवळपास पाच दशक पूर्ण झाली आहेत. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनैगा करोडपती सीझन १५’ मुळे चर्चेत आहेत. बच्चन यांचा हा क्वीज शो गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. याच लोकप्रिय शोमध्ये बिग बींना वाढदिवसानिमित्ताने एक खास सरप्राइज देण्यात आलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Bigg Boss 17: बिग बॉसच्या आगामी पर्वात सिस्टम हँग करायला एल्विश यादव नाही, तर ‘ती’ येणार?

‘सोनी टीव्ही’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बींचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, ‘कौन बनैगा करोडपती सीझन १५’च्या मंचावर दिलेलं सरप्राइज पाहून अमिताभ बच्चन भावुक झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळी ते म्हणतात की, मी इतरांना टिशू द्यायचो पण आज मलाच टिशूची गरज भासली आहे. अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: स्वरा मल्हारची मुलगी असल्याचं सत्य अखेर शुभंकरसमोर उघड करणार ‘ही’ व्यक्ती, ‘तुझेच मी गीत गात आहे’चा नवा प्रोमो आला समोर

हेही वाचा – Video: ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सादर केली नवी मराठी कविता; चाहते म्हणाले, “लय मस्त..”

दरम्यान, आता ‘कौन बनैगा करोडपती सीझन १५’च्या आगामी भागांत चाहत्यांनी बिग बींना असं काय सरप्राइज दिलं, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले, हे समजेल. दरवर्षी ‘कौन बनैगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यांना एक खास सरप्राइज दिलं जात. गेल्या वर्षी ‘केबीसी’च्या मंचावर बिग बींच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या आईचा आवाज ऐकवला होता. यावेळी देखील आईचा आवाज ऐकून अमिताभ बच्चन खूप भावुक झाले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan emotional in kaun banega crorepati 15 pps