KBC 14 : "गंभीर सीनच्यावेळी काजोल..." बिग बींनी सांगितला 'कभी खुशी कभी गम'च्या सेटवरील 'तो' किस्सा | amitabh bachchan shares an incident from the sets of K3G with kajol on the sets of kbc 14 | Loksatta

KBC 14 : “गंभीर सीनच्यावेळी काजोल…” बिग बींनी सांगितला ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवरील ‘तो’ किस्सा

काजोल आणि रेवती यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दलही भरपूर गप्पा मारल्या

KBC 14 : “गंभीर सीनच्यावेळी काजोल…” बिग बींनी सांगितला ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवरील ‘तो’ किस्सा
अमिताभ बच्चन आणि काजोल (फोटो : सोशल मीडिया)

कौन बनेगा करोडपती १४ चा लेटेस्ट एपिसोड चांगलाच मजेशीर ठरला. अभिनेत्री काजोलने ‘सलाम वेंकी’ दिग्दर्शिका रेवती यांच्यासोबत हॉट सीटवर बसून खूप धमाल केली. शिवाय अमिताभ बच्चन यांनीदेखील या दोघींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शिवाय रेवती यांनी ज्या पद्धतीने हा खेळ खेळला त्याचं कौतुकही बिग बी यांनी केलं. याबरोबरच बच्चन यांनी काजोलबरोबरचे चित्रपटातील बरेच किस्सेदेखील सांगितले.

एपिसोड सुरू होताच, एका स्पर्धकाने काजोलला विचारले की एक तिला कोणती सुपरपॉवर हवी आहे. या प्रश्नावर बिग बी उत्तरले की, “स्त्री असणं हीच एक सुपरपॉवर आहे.” नंतर खेळात पुढे गेल्यावर बंगाली खाद्यपदार्थांवर प्रश्न समोर आला तेव्हा काजोलची प्रतिक्रिया पाहून अमिताभ यांना हसू फुटलं. स्क्रीनवर पर्याय दिसण्याआधीच, तिने ‘लाइफलाइन’ असे ओरडून प्रश्नाला फाटा दिला.

आणखी वाचा : “…म्हणून माझ्याऐवजी मलायका” शिल्पा शिरोडकरने सांगितलं ‘छैया छैया’ गाण्यात तिला न घेण्यामागचं कारण

त्यानंतर कार्यक्रमात एका लहान मुलाने काजोलला प्रश्न विचारला की ‘कभी खुशी कभी गम’दरम्यान बच्चन यांच्याबरोबर काम करताना तिला भीती वाटली की नाही? यावर होकारार्थी उत्तर देत काजोल म्हणाली, “मी त्यांना खूप घाबरायचे.” काजोलच्या या उत्तराला खोडून काढत बिग बि म्हणाले, “खोटं बोलणं काजोलकडून शिकायला हवं. चित्रपटात जरी घाबरण्याच्या अभिनय करत असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ती अजिबात घाबरत नाही.”

इतकंच नाही तर एका गंभीर सीनदरम्यानचा किस्सादेखील अमिताभ यांनी शेअर केला. ‘कभी खुशी कभी गम’मधील एका गंभीर सीनदरम्यान काजोल प्रचंड हसत होती. याबद्दल सांगताना बच्चन म्हणाले, “हिला एकही संवाद नव्हता, सगळे रडत होते, गंभीर चेहेरे करून अभिनय करत होते, आणि काजोल नुसती खिदळत होती. काजोल तुला माहितीये का एका सहकलाकाराचं लक्ष यामुळे विचलित होतं.” बिग बी यांच्या या वक्तव्यावर हसतच काजोलने तिचा चेहेरा लपवला. काजोल आणि रेवती यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दलही भरपूर गप्पा मारल्या. ‘सलाम वेंकी’ ९ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:29 IST
Next Story
‘बिग बॉस’शी बोलताना ढसाढसा रडला शिव ठाकरे; वीणाचं नाव घेत म्हणाला, “तिला…”