scorecardresearch

“…म्हणून माझ्याऐवजी मलायकाची निवड झाली” शिल्पा शिरोडकरने सांगितलं ‘छैया छैया’ गाण्यात तिला न घेण्यामागचं कारण

याबद्दल नुकतंच अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने भाष्य केलं आहे

“…म्हणून माझ्याऐवजी मलायकाची निवड झाली” शिल्पा शिरोडकरने सांगितलं ‘छैया छैया’ गाण्यात तिला न घेण्यामागचं कारण
नम्रता शिरोडकर (फोटो : सोशल मीडिया)

शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांच्यावर चित्रित झालेलं ‘छैय्या छैय्या’ हे गाणं आजही लोक गुणगुणतात. बॉलिवूड ब्यूटी मलायका अरोरा आणि सुपरस्टार शाहरुख खान यांनी २४ वर्षांपूर्वी ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर डान्स केला होता. इतकी वर्षे झाली असली तरीही हे गाणं अजूनही लोकप्रिय आहे. मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटातील हे गाणं अनेकांच्या ओठांवर असतं. हे गाणं मलायकाच्या करिअरमधील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.

परंतु मलायका या गाण्यासाठी पहिली निवड नव्हती याबद्दल कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिने नुकताच खुलासा केला. अलीकडेच फराहने मलायकाच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या वेब शोमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान तिने या गोष्टीचा खुलासा केला होता. फराहच्या म्हणण्यानुसार शिल्पा शेट्टी, शिल्पा शिरोडकर आणि आणखी काही अभिनेत्रींना या गाण्यासाठी विचारण्यात आलं होतं.

आणखी वाचा : शाहरुखच्या ‘छैया छैया’ गाण्यासाठी मलायकाला नव्हती पहिली पसंती; इतक्या वर्षांनी फराह खानने उघड केले गुपित

एका अभिनेत्रीला ट्रेनमध्ये चढण्याचा फोबिया होता, तर एक अभिनेत्री उपलब्ध नव्हती. तेव्हा एका मेकअप करणाऱ्याने मलायकाचं नाव सूचवलं आणि अशा रीतीने मलायकाची वर्णी लागली. याबद्दल नुकतंच अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने भाष्य केलं आहे. ‘इ-टाइम्स’शी संवाद साधताना शिल्पाने या गाण्यात तिला न घेण्यामागचं कारण सांगितलं आहे.

‘छैय्या छैय्या’ गाण्यात काम न मिळाल्याबद्दल शिल्पा म्हणाली, “त्या गाण्यासाठी माझी निवड झाली होती, पण नंतर अचानक त्यांना मी जास्त जाड आहे असं वाटल्याने त्यांनी त्यात मलायकाला घेतलं.” यामुळे नम्रता चांगलीच निराश झाली होती, शाहरुख खानबरोबर काम करण्याची संधी हुकल्याने नम्रताला चांगलंच वाईट वाटलं हे तिने या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं. २००५ साली नम्रताने दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूशी लग्न केलं आणि त्यानंतर तिने मनोरंजनसृष्टीपासून फारकत घेतली.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 09:42 IST

संबंधित बातम्या