Bharti Singh Prays To Ganpati Bappa For A Baby Girl : सध्या सर्वत्र गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आहे. सगळीकडे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. कलाकारांच्या घरीदेखील गणपती बाप्पाचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेत्री भारती सिंहच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे.
भारतीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं असून, तिनं नुकतीच त्यानिमित्त ‘टेलीमसाला’ला मुलाखत दिली आहे. यावेळी तिनं बाप्पाकडे एक इच्छा व्यक्त केली आहे. त्यामध्ये तिला यंदा बाप्पाकडे काय मागणार आहेस, असं विचारण्यात आलं होतं. त्यावर ती म्हणाली की, “या वर्षी मी हीच प्रार्थना करेन की, सगळं नीट होऊ देत. कोविडसारख्या समस्या पुन्हा येऊ नयेत. सगळ्यांना गणेशोत्स्व आनंदात जल्लोषात साजरा करता यावा.
भारतीला यावेळी तिच्या मुलाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्याला बाप्पाकडून काय हवं आहे. त्यावर ती म्हणाली, “त्याला एक छोटी बहीण हवी आहे, जी त्याच्याबरोबर मस्ती करेल. मी हर्षबरोबर याबद्दल बोलली आहे”.
भारतीसह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. काल गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सर्व जण बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी मोठ्या जल्लोषात बाहेर पडताना दिसले. त्यादरम्यान अनेक कलाकारांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
गणेशोत्सवनिमित्त अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामध्ये काही कलाकारांनी मात्र इतरांप्रमाणे गणेशमूर्ती बाहेरून खरेदी न करता, घरीच स्वत:च्याच हातांनी मूर्ती घडवली. काही जण पर्यावरणपूरक गोष्टी लक्षात घेऊन गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, भारती सिंहबद्दल बोलायचं झालं, तर अलीकडेच ती ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमातून झळकली होती. तिच्यासह त्यामध्ये हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय कलाकार झळकले होते. त्यासह अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिथे तिचा मोठा चाहतावर्ग आहे.