‘बिग बॉस’ हिंदीचं १३वं सीझन अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात असेल. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला या पर्वाचा विजेता ठरला. तर या पर्वामधील इतर मंडळीही बरीच चर्चेत होती. त्यातीलच दोन स्पर्धक म्हणजे पारस छाबरा व माहिरा शर्मा. पारस व माहिरा या शोच्या संपूर्ण प्रवासामध्ये एकत्र दिसले. ‘बिग बॉस’च्या घरात असतानाच या दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगत होत्या. अखेरीस ते खरं ठरलं. शो संपल्यानंतरही पारस व माहिरा एकमेकांना डेट करत होते. पण आता एक वेगळीच बातमी समोर आली आहे.
पारस व माहिरा एकमेकांना डेट करत होते. दोघांचे एकत्रित फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. पारस व माहिराचं ब्रेकअप झालं आहे. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार माहिराच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, “माहिरा व पारस लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते. चंदीगढमध्ये एकाच इमारतीमध्ये दोघंही राहत होते”.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
“त्या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं? हे माहित नाही. पण सध्यातरी माहिराला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे”. एक महिन्यापूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं असल्याचं बोललं जात आहे. शिवाय आता ती मुंबईमध्ये राहण्यासाठी आली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने पारसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने माहिराबरोबर असलेल्या नात्याबाबत भाष्य केलं.
आणखी वाचा – स्वतःपेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रश्मिका मंदाना, साखरपुडाही झाला पण…
पारस म्हणाला, “आम्ही कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हतो. त्यामुळे ब्रेकअप होण्याचा काहीही संबंध नाही. आमच्यामध्ये अजूनही मैत्रीचं नातं आहे”. तर माहिराने अजूनही या सगळ्या चर्चांबाबत मौन पाळलं आहे. तर दुसरीकडे माहिराने पारसबरोबरचे सगळे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरुन डिलिट केले आहेत. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.