‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे काही विनोदी कलाकार बरेच चर्चेत आले. या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. इतकंच नव्हे तर त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. वनिताने नाटकांपासून तिच्या अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली. पण अजूनही तिचं राहणीमान अगदी साधं आहे.

वनिताने नुकतंच ‘संपूर्ण स्वराज’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिचं राहणीमान आणि कुटुंबाविषयी भाष्य केलं. ती चाळीमध्येच लहानाची मोठी झाली. वनिताचे आई-वडील अजूनही चाळीतच राहतात. सेलिब्रिटी म्हटलं की, लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. पण मला अगदी साधंच राहायचं आहे असं वनिताचा म्हणणं आहे.

obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”
Ram Navami 2024 Wishes Messages Status in Marathi
Ram Navami 2024 Wishes : रामनवमीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

आणखी वाचा – महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला पुन्हा डेट करतेय जान्हवी कपूर? हात पकडत शेअर केला फोटो, म्हणाली…

आणखी वाचा – Video : “याला म्हणतात संस्कार”, मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीने केलं असं काही की…; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “पैसा असूनही…”

वनिता म्हणाली, “मी मध्यमवर्गीय आहे. सामान्य कुटुंबाधूनच मी इथवर पोहोचली. आपण टीव्हीवर दिसणाऱ्या लोकांना पाहून भारावून जाणारी लोकं आहोत. टीव्हीवर दिसणाऱ्या लोकांचं कमाल लाइफस्टाइल असेल असं आपल्याला वाटतं. पण प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतंच असं मला वाटत नाही. पैसे, राहणीमान किंवा इतर बाबतीत हळूहळू एखादा व्यक्ती प्रगती करतो”.

आणखी वाचा – दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

“टीव्हीवर दिसणाऱ्या माणसांकडे खूप पैसे असतात असं लोकांना वाटतं. पण असंच असतं असं काही नाही. मी अजूनही चाळीत राहत होते. लग्नानंतर मी दुसऱ्या ठिकाणी राहायला आली आहे. माझे आई-बाबा अजूनही चाळीत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात. जेव्हा मी बाईकवरुन फिरते तेव्हा लोकांना असं वाटतं की, काय ही बाईकने प्रवास करते. तुम्ही सेलिब्रिटी आहात तर गाडीने फिरलं पाहिजे. पण मला जसं आहे तसंच राहायला आवडतं. आपण साधी माणसं आहोत आणि मला तसंच राहायचं आहे”. वनिताचा हा साधेपणा खरंच कौतुकास्पद आहे.