Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचं नाव घेताच काही सदस्य पटकन आठवतात. त्यापैकी एक म्हणजे रजत दलाल. रजत दलाल ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता होईल, अशी अनेकांची इच्छा होती. प्रेक्षक त्याला भरभरून मतं देताना दिसत होते. त्यामुळे सर्वजण रजतचं ‘बिग बॉस’चं १८वं पर्व जिंकणार, असं म्हणत होते. पण, तसं काही झालं नाही. ज्यावेळी रजत तिसऱ्या स्थानावरून बाद झाला तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. स्वतः सलमान खानदेखील म्हणाला होता की, मला एलिमिनेट होणाऱ्या सदस्याचं नाव सांगताना आश्चर्य वाटतं आहे. रजत दलालचा प्रवास इथेच संपला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा १९ जानेवारीला पार पडला होता. यावेळी सलमान खानने करणवीर मेहरा विजेता ठरल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा रजतला अजिबात आनंद झाला नसल्याचं दिसत होतं. विजेता म्हणून करणचं नाव ऐकताच रजतने टाळ्यादेखील वाजल्या नव्हत्या.

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात रजत आणि चाहत पांडेची एक वेगळीच बॉन्डिंग पाहायला मिळाली. दोघांना एकत्र बघायला प्रेक्षकांना खूप आवडायचं. दोघांमध्ये जितकी भांडणं पाहायला मिळाली, तितकंच प्रेमदेखील दिसलं. त्यामुळे दोघांच्या नावाचे हॅशटॅग खूप चर्चेत आले. ‘बिग बॉस’चं १८वं पर्व संपून ११ दिवस झाले आहेत तरी अजूनही दोघांच्या नावाचे हॅशटॅग ट्रेंड होतं असतात. नुकतंच रजतने चाहत पांडेबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

रजत दलाल एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. यावेळी एल्विशने रजतला विचारलं की, चाहत पांडे कशी वाटते? हा प्रश्न ऐकताच रजतने हात जोडून विनंती केली की, चाहतसंदर्भातील चर्चा बंद करा. चाहत आणि रजतचा #RaHat या हॅशटॅगच्या माध्यमातून दोघांचे ‘बिग बॉस’च्या घरातील व्हिडीओ व्हायरल होतं असतात.

दरम्यान, एल्विशच्या पॉडकास्टमध्ये रजतने दिग्विजय सिंह राठीबाबत सांगितलं की, ‘बिग बॉस’मध्ये येऊन दिग्विजयने स्वतःची प्रतिमा खराब केली. तो शोमध्ये खूप दमदार अंदाजात आला होता. पण काही खास करू शकला नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 fame rajat dalal talk about chahat pandey and controversy pps