‘बिग बॉस’चं १८वं पर्व चांगलंच गाजलं. १९ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या पर्वाचा विजेता करणवीर मेहरा ठरला. तर उपविजेता विवियन डिसेना झाला. ‘बिग बॉस’चं १८वं पर्व संपून १० दिवस झाले आहेत. पण, अजूनही या पर्वात सहभागी झालेले सदस्य खूप चर्चेत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी विवियन डिसेनाची पत्नी नूरन अलीने पार्टी आयोजित केली होती. यावेळी करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग यांना आमंत्रण दिलं नव्हतं. याव्यतिरिक्त अविनाश मिश्रा, ईशा सिंह, यामिनी मल्होत्रा, एडिन रोज, चाहत पांडे, अरफीन खान, सारा खान, हेमा शर्मा, मुस्कान बामने, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, विकी जैन असे अनेक जण विवियनच्या पार्टीत पाहायला मिळाले होते. त्यानंतर नुकतेच करण, चुम, शिल्पा आणि दिग्विजय सिंह राठी पार्टी करताना पाहायला मिळाले. याचे फोटो, व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाले आहेत. पण यादरम्यान, विवियन डिसेनाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला.

विवियन डिसेनाची पत्नी नूरन अलीचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने विवियनने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विवियन ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ गाणं गाताना दिसत आहे. याच वेळी तो पत्नीला फ्लाइंग किस देतो. हा व्हिडीओ शेअर करत विवियनने त्यावर लिहिलं आहे, “नूरन वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप सारं प्रेम.”

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/Vivian-Dsena.mp4

दरम्यान, विवियन डिसेनाची नूरन अली दुसरी पत्नी आहे. लग्नानंतर दोघांना एक मुलगी झाली. त्याआधी नूरनच्या दोन मुली होत्या. त्यामुळे विवियन आणि नूरनला एकूण तीन मुली आहेत.

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सर्वाधिक मानधन घेणारा सदस्य विवियन डिसेना होता. हिंदी टेलिव्हिजनवरील विवियन हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने ‘प्यार की ये एक कहानी’, ‘मधुबाला – एक इश्क एक जुनून’, ‘शक्ति – अस्तित्व के एहसास की’ आणि ‘सिर्फ तुम’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. विवियन डिसेनाची २० कोटी एवढी संपत्ती आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 fame vivian dsena share special post for wife nouran aly pps