Bigg Boss 19 Nominations : ‘बिग बॉस १९’मध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत आहेत. या घरातील दोन स्पर्धक बसीर अली आणि नेहाल चुडासमा यांचा प्रवास नुकताच संपला. त्यानंतर आता उर्वरित स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. ‘बिग बॉस’चा हा शो जसजसा पुढे जात आहे, तसतसा स्पर्धकांचा खेळ आणखीनच स्पर्धात्मक बनत आहे.

बसीर अली आणि नेहल चुडासमा घरातून बाहेर पडताच या आठवड्यात नवा नॉमिनेशन टास्क पार पडला आणि त्यावेळी बिग बॉसनं अभिषेक बजाज आणि अशनूर कौरला नॉमिनेट केलं. अभिषेक आणि अशनूर यांनी माईकचा वापर न केल्यानं त्यांना ‘बिग बॉस’कडून नॉमिनेट करण्यात आलं आणि घरातील स्पर्धकांना त्यासंबंधीचा अंतिम निर्णय देण्याबद्दल सांगण्यात आलं.

घरातील स्पर्धकांची एकमेकांशी सहमती न झाल्यानं त्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी कॅप्टन मृदुल तिवारीला सांगितलं गेलं. मात्र, त्यानंही योग्य असा निर्णय घेतला नाही आणि परिणामी अभिषेक व अशनूर नॉमिनेशनपासून वाचले.

या नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा ट्विस्ट आला, तो म्हणजे अशनूर आणि अभिषेक वगळता सर्व सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यानुसार आता या आठवड्याच्या नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये कुनिका सदानंद, नीलम गिरी, मालती चहर, शेहबाज, तान्या मित्तल, अमाल मलिक, प्रणीत मोरे, फरहान भट्ट व गौरव खन्ना यांचा समावेश आहे.

‘बिग बॉसच्या १९’व्या या सीझनमध्ये कोण विजेता ठरेल याचा अंदाज करणं आता प्रेक्षकांसाठीही कठीण झालं आहे. कारण- ‘बिग बॉस १९’मधील जवळपास सगळेच स्पर्धक उत्तम खेळ खेळत आहेत. तसेच या घरातील सर्वच स्पर्धकांचा प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे त्यांना चाहत्यांचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. अशातच आता या आठवड्यात केवळ दोन स्पर्धक सोडता, घरातील सर्व स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.

बिग बॉस १९ मध्ये या आठवड्यात ‘हे’ स्पर्धक झाले नॉमिनेट

नॉमिनेशनबरोबरच आता ‘बिग बॉस’च्या घरात आणखी एक वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अर्थात, त्याबद्दल अद्याप वाहिनीकडून कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, आता या आठवड्यात कुनिका, नीलम, मालती, शेहबाज, तान्या, अमाल, प्रणीत, फरहान व गौरव यांपैकी कुणाचा गेम सुधारणार? टास्कमधील खेळानुसार कोण टिकणार? आणि कोण घराबाहेर जाणार? हे जणू घेण्याची सर्व स्पर्धकांना उत्सुकता लागून राहिली आहे.