Bigg Boss 19 Amaal Malik : ‘बिग बॉस १९’मधील सगळेच स्पर्धक सध्या चांगलेच चर्चेत आहेत. यापैकी अमाल मलिक शोच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेतला स्पर्धक आहे. आपल्या गाण्यानं चर्चेत राहणारा अमाल या शोमध्ये मात्र अपल्या चुकीच्या वागण्यानं चर्चेत आहे. दोन आठवड्यांपूर्वी तर त्यानं फरहाना भट्टबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

अमाल घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासून वादांमध्ये सापडला आहे. त्याच्या या वागण्याबद्दल वीकेंड का वारमध्ये सलमानकडून त्याला ओरडाही मिळतो. तसंच अनेक प्रेक्षकही अमालच्या वागणुकीवर टीका करतात. मात्र, असं असलं तरी त्याचे चाहते आणि कुटुंबीय त्याच्यामागे ठामपणे उभे आहेत. दर आठवड्यात त्याची नॉमिनेशनमधून सुटका होते.

‘बिग बॉस’च्या घरातील चुकीच्या वागणुकीबद्दल त्याला गेल्या आठवड्यात त्याच्या वडिलांनी समज दिली होती. अशातच आता त्याच्या काकीनंही त्याची बाजू घेतली आहे. ‘नवभारत टाइम्स डिजिटल’शी बोलताना अमालची आत्या रोशन गॅरी यांनी सांगितलं की, त्या बाहेरून अमालचा प्रवास कसा आहे ते पहात आहेत. त्यांनी म्हटलं, “अमाल मला रॉबिनहूडसारखा वाटतो. तो नेहमी आपल्या मित्रांबरोबर उभा राहतो आणि सगळ्यांना मदत करतो. नीलम असो वा मृदुल… तो सगळ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.”

अमाल मलिक इन्स्टाग्राम पोस्ट

अमालच्या चुकीच्या बोलण्यावरून निर्माण झालेल्या वादाबद्दल रोशन गॅरी म्हणाल्या, “बिग बॉसच्या घरात कोणीही साधूसंत नाही. सगळेच कधी ना कधी वाद घालतात, रागावतात.” यानंतर त्यांनी अमालबाबतच्या पक्षपातीपणाबद्दलही प्रतिक्रिया दिली. सलमान खानच्या अमालबरोबरच्या वागणुकीबद्दल त्या म्हणाल्या, “अमालबाबत शो अजिबात पक्षपातीपणा करत नाहीय. जर तसं असतं तर त्याला वारंवार ओरडलं गेलं नसतं. त्याचे मित्र घराबाहेर झाले नसते.”

‘बिग बॉस’च्या घरातील अमालच्या नात्यांबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, “तो मित्र म्हणून खूप चांगला आहे. पण, नीलम थोडी त्याचा फायदा घेतेय असं वाटतं. ती स्वतःला वाचवते, पण इतरांशी भांडते. तिनं तान्याशी भांडण केलं, फरहानाला चुकीचं दाखवलं. मला वाटतं नीलम थोडी स्वार्थी आहे.” पुढे मालतीबद्दल त्यांनी म्हटलं, “ती कोणाबद्दलही काहीही बोलते, पण मला अमाल आणि तान्याची मैत्री खूप आवडते.”

दरम्यान, या आठवड्यातील नॉमिनेशनमध्ये अमालचं नाव आहे. अमालसह गौरव खन्ना, तान्या मित्तल, प्रणीत मोरे, मालती चाहर, फरहाना भट्ट, नीलम गिरी आणि शहबाज बदेशा या नावांचाही समावेश आहे. यापैकी एका सदस्याचा या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपणार आहे.