Bigg Boss 19 Pranit More Video : ‘बिग बॉस’चं घर म्हटलं की, अनेकांसमोर भांडण, वादविवाद आणि एकमेकांवरील आरोपांचं चित्र उभं राहतं. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात कधी कधी अशा काही अशा घटना घडतात, जे या सगळ्याला छेद देतात. असंच काहीसं झालं ‘बिग बॉस’च्या रविवारच्या दिवाळी स्पेशल भागात…
‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता जवळपास ५० दिवस पूर्ण झाले आहेत. जसजशी ही स्पर्धा पुढे जात आहे, तसतसे स्पर्धक आपला खेळ सुधारित अंतिम फेरीत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. खेळ खेळताना अनेकदा या स्पर्धकांमध्ये हाणामारी, भांडण आणि वाद होताना दिसतात. मात्र, अनेकदा ‘बिग बॉस’च्या घरामधील स्पर्धकांच्या काही कृती मन जिंकतात.
‘बिग बॉस’च्या घरात नुकताच दिवाळी स्पेशल भाग झाला. यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात Thamma सिनेमाचे कलाकार प्रमोशनसाठी आले होते. तसेच बॉलीवूडच्या काही कलाकार मंडळींनीसुद्धा ‘बिग बॉस’च्या घरात दिवाळीनिमित्त हजेरी लावली होती. यावेळी प्रणीत मोरे, गौरव खन्ना व मृदुल तिवारी यांच्या एका कृतीनं अनेकांची मनं जिंकली.
दिवाळ सणानिमित्त अनेक मराठी कुटुंबात पाहुणे मंडळी एकत्र येत असतात. तेव्हा लहान मुलं मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. मराठी कुटुंबातले हेच संस्कार ‘बिग बॉस’च्या घरातही जपले गेले. ‘बिग बॉस १९’मध्ये मराठमोळा कॉमेडीयन प्रणीत मोरे सहभागी झाला आहे. या घरातील साध्या राहणीमानानं आणि आपल्या खेळानं तो अनेकांची मनं जिंकत आहे. अशातच त्याची या घरातील एक कृती सोशल मीडियावर कौतुकास्पद ठरली आहे.
‘बिग बॉस’मधील दिवाळी स्पेशल भागात प्रणीत मोरे त्याच्यापेक्षा मोठ्या गौरव खन्नाच्या पाया पडला. ‘बिग बॉस’च्या घरात प्रणीतला त्याच्या कुटुंबीयांचा व्हिडीओ दाखवण्यात आला. तेव्हा गौरव त्याला म्हणाला, “तुला घरच्यांचं पत्रही मिळालं, त्यांना व्हिडीओद्वारे पाहताही आलं. आता मस्त खेळ.” तेव्हा प्रणीत म्हणतो, “माझ्यावर देवाचा आशीर्वाद आहे.” त्यानंतर गौरव त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तेवढ्यात प्रणीत लगेच गौरवच्या पाया पडतो. पुढे लगेच मृदुलही मोठा भाऊ म्हणून गौरवच्या पाया पडत त्याचे आशीर्वाद घेतो.
प्रणीत मोरेचा गौरव खन्नाच्या पाया पडतानाचा व्हिडीओ
प्रणीतनं गौरवच्या पाया पडल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यावर प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये प्रणीतच्या संस्कारांचं आणि साधेपणाचं कौतुक केलं आहे. “हा ग्रुप सगळ्यात छान आहे”, “याला म्हणतात संस्कार”, “खूपच छान” या अनेक अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात मृदुल, गौरव व प्रणीत मोरे यांच्यात खास बॉण्ड तयार झाला आहे. हे त्रिकूट प्रेक्षकांनाही आवडत आहे.