Bigg Boss 19 Gaurav Khanna :’बिग बॉस १९’मधील काही चर्चेत राहणाऱ्या स्पर्धकांपैकी एक म्हणजे गौरव खन्ना. पहिल्या दिवसापासूनच गौरवचा ‘बिग बॉस’च्या घरातील खेळ सर्वांना आवडत आहे. त्याचं चाहत्यांकडून कौतुकही होत आहे. नुकतीच त्याला कॅप्टन्सीही मिळाली होती, पण अवघ्या काही क्षणांतच त्याची ही कॅप्टन्सी गेली. त्याच्याऐवजी आता शेहबाज बदेशा नवा कॅप्टन झाला आहे.
गौरव खन्ना या शोमध्ये आल्यापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा होतेय. गौरव खन्नाने अभिनेत्री आकांक्षा चमोलाशी लग्न केलंय. दोघे त्यांच्या नात्याबद्दल व्यक्त होताना दिसतात. अशातच ‘बिग बॉस’च्या नुकत्याच झालेल्या भागात गौरवची पत्नी (आकांक्षा चमोला) बाळाबद्दल प्लॅनिंग करत असल्याचं सेलिब्रिटी ज्योतिष जय मदानानं म्हटलं आहे.
गौरव व आंकाक्षा यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. गौरवने याआधी ‘बिग बॉस’च्या घरात त्यांच्या बाळाबद्दल वक्तव्य केलं होतं. एक्स स्पर्धक मृदुलशी बोलताना गौरवने ‘माझ्या पत्नीला मुलं नको आहेत’ असं म्हटलं होतं. मात्र, आता सेलिब्रिटी ज्योतिष जय मदाननं ती बाहेर बाळाचं प्लॅनिंग करतेय असं म्हटलं आहे.
‘बिग बॉस’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये गौरव खन्नाने जय मदानकडून तो आणि त्याची पत्नी आकांशा चमोला भविष्यात मुलांचा विचार करत असल्याचं म्हटलं. यावेळी त्याने विचारले, “आम्हाला भविष्यात मुलं होतील का? आम्ही अजूनतरी त्याबद्दल विचार केला नाहीय. पण, भविष्यात मुलांबद्दल प्लॅनिंग करू शकतो का?” त्यावर जय मदाननं उत्तर दिले, “ती (गौरवची पत्नी) याबाबत नक्कीच गांभीर्याने विचार करत आहे.” यानंतर गौरवला खूपच आनंद झाला.
गौरव खन्ना इन्स्टाग्राम पोस्ट
गौरव खन्ना व आकांक्षा चमोला यांची लव्ह स्टोरी खूप फिल्मी आहे. दोघांची पहिली भेट एका ऑडिशनवेळी झाली होती. गौरवला पहिल्या नजरेत आकांक्षा आवडली. हळूहळू दोघांचं बोलणं वाढलं, जवळीक वाढली आणि बघता बघता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर काही काळ डेटिंग केल्यानंतर गौरव व आकांक्षा यांनी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी कानपूरमध्ये लग्न केलं. दोघांमध्ये नऊ वर्षांचं अंतर आहे.
