Bigg Boss 19 : ‘बिग बॉस १९’ची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. शोमध्ये रोज भांडण आणि वादविवाद होत असले तरी प्रेक्षकांची या शोला तितकीच पसंतीही मिळताना दिसत आहे. शोबरोबरच शोमधील स्पर्धकांचीसुद्धा लोकप्रियता वाढत आहे.
बिग बॉस १९ च्या घरातील स्पर्धकांनी आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शोच्या लोकप्रियतेत आणि वोटिंगच्या ट्रेंड्समध्ये कुठला स्पर्धक आघाडीवर आहे? शोमध्ये कोण सर्वाधिक लोकप्रिय आहे? आणि कोण या शोच्या महाअंतिम सोहळ्याच्या शर्यतीत आपलं स्थान टिकवून ठेवणार? चला जाणून घेऊ…
BB Tak च्या वृत्तानुसार, गौरव खन्ना सर्वाधिक मते मिळवून लोकप्रियतेच्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहे. त्यानंतर लोकप्रियतेच्या ट्रेंडमध्ये दुसऱ्या क्रमांकावर फरहाना भट्टचा नंबर येतो, तर ‘बिग बॉस १९’मधील सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येणारा स्पर्धक आहे प्रणित मोरे.
गौरव, फरहाना आणि प्रणितनंतर चौथ्या स्थानावर अश्नूर कौर आहे. त्याखाली पाचव्या क्रमांकावर तान्या मित्तल आहे, तर याखाली सहाव्या स्थानावर अमाल मलिकचा नंबर येतो. यानंतर सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर अनुक्रमे मालती चहर, शहबाज बदेशा आणि कुनिका सदानंद यांची नावे आहेत.
दरम्यान, एकूण नऊ स्पर्धकांमध्ये शहबाज बदेशा, मालती चहर आणि कुनिका सदानंद या तिघांची लोकप्रियता कमी आहे. कुनिका यांना कमी मतं असूनही गेल्या काही आठवड्यांपासून त्या एलिमिनेशनपासून सेफ होत आहेत.
BB Tak ने शेअर केलेली एक्स पोस्ट
‘बिग बॉस १९’मधील ही स्पर्धा आता हळूहळू आणखी रंगतदार बनत चालली आहे. शोच्या अंतिम सोहळ्यात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक स्पर्धक मेहनत करताना दिसून येत आहे. शोच्या महाअंतिम सोहळ्यासाठी आता फक्त तीन आठवडे शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे शोच्या अंतिम भागात कुठला स्पर्धक आपलं स्थान टिकवून ठेवणार याची अनेक बिग बॉस प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
