Bigg Boss 19 Nagma Mirajkar Shares Emotional Post : सलमान खानचा ‘बिग बॉस’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदाचं हे ‘बिग बॉस’चं १९ वं पर्व असून यात अनेक नवनवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’ सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत आणि या खेळाला आता हळूहळू रंगत येत आहे. अशातच ‘बिग बॉस १९’चं पहिलं एलिमिनेशन पार पडलं.
‘बिग बॉस १९’ च्या वीकेंड का वारमध्ये घरातील एक नव्हे तर दोन जण बाहेर पडले. वीकेंडच्या वारी फराहने घोषणा केली होती की या आठवड्यात डबल एविक्शन होणार आहे. यापैकी एक म्हणजे नतालिया जानोस्झेक आणि दुसरी म्हणजे नगमा मिराजकर.
गेल्या आठडव्यात नगमा मिराजकर, आवेज दरबार, नतालिया जानोस्झेक आणि मृदुल तिवारी हे चार सदस्य नॉमिनेट होते. त्यापैकी नगमा आणि नतालिया यांचा प्रवास संपला. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच आता नगमाने भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये नगमा म्हणते, “मी इतक्या लवकर बाहेर पडेन, असं कधीच वाटलं नव्हतं. जर मी माझ्या चाहत्यांची अपेक्षा पूर्ण करू शकले नसेल, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. प्रकृती नीट नसतानाही मी या स्पर्धेत होते. त्यामुळे मला स्वतःबद्दल खूप काही शिकायला मिळालं… हे मी आयुष्यभर माझ्याबरोबर जपून ठेवणार आहे.”
यानंतर नगमा म्हणते, “या प्रवासाचा भाग होणं, ही माझ्या आयुष्यातली एक मोठी संधी होती आणि यासाठी मी मनापासून आभारी आहे. ‘बिग बॉस’च्या घरातले प्रत्येक हसू, प्रत्येक अश्रू आणि अनेक आठवणी… हे सगळं माझ्या मनाच्या खूप जवळ राहील. त्या घरात राहण्याची ती भावना मला खूप मिस करेन. माझा प्रवास इथे संपतोय, पण माझं मन अजूनही त्या घरात आहे, त्या घरातील माझ्या जवळच्या लोकांबरोबर.”
नगमा मिराजकर इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे नगमा म्हणाली, “मी आवेजला नेहमीच पाठिंबा देत राहणार आहे. मला ठाऊक आहे, तो नक्की चांगला खेळ खेळणार. घरात ज्यांनी ज्यांनी माझा प्रवास खूप सुंदर केला, त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. हा काही शेवट नाही… हे फक्त एक पर्व आहे ज्याला मी सदैव जपणार आहे. प्रेम, शक्ती आणि प्रार्थना पाठविलेल्या प्रत्येकाला धन्यवाद. हा प्रवास माझा होता, पण तुम्ही सगळ्यांनी त्याला ‘आपला’ बनवलं. आणि हो… तुम्ही तयार केलेले व्हिडीओचे अनेक एडिट्स पाहून मी खूप भावुक झाले.”