Bigg Boss 19 Eviction: ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे आणि या शोमध्ये बरेच वाद पाहायला मिळाली आहे. चार आठवड्यांपासून घरात गप्प बसलेले अनेक स्पर्धक आता अॅक्शन मोडवर आले आहेत. एका महिन्यात सलमान खानच्या शोमधून दोन स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले आहे. नतालिया आणि नगमा या दोघी शोमधून एलिमिनेट झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात, नेहलला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं, परंतु बिग बॉसने सिक्रेट रूममध्ये पाठवलं होतं. आता, या आठवड्यात शोमधून कोण बाहेर होणार? त्या स्पर्धकाचं नाव आलं आहे.

काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये नॉमिनेशन टास्क झाला. या टास्कमध्ये प्रणित मोरेच्या टीमचा पराभव झाला. आणि टीममधील प्रणित मोरे, मृदुल तिवारी, गौरव खन्ना, आवेज दरबार, अशनूर कौर आणि नीलम गिरी हे स्पर्धक नॉमिनेट झाले. आता, या वीकेंड का वारमध्ये या स्पर्धकांपैकी एकाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.

फरहाना भट्ट बिग बॉस १९ मधून बाहेर जाणार, अशा बातम्या येत होत्या. पण बिग बॉस शोबद्दल अपडेट्स देणाऱ्या काही सोशल मीडिया हँडलवरील ताज्या पोस्टनुसार, आवेज दरबार या आठवड्यात शोमधून बाहेर पडेल. प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे त्याला बाहेर काढलं जाईल, कारण त्याला नॉमिनेटेड स्पर्धकांपैकी सर्वात कमी मतं मिळाली आहेत.

वीकेंड का वारमध्ये येणार गौहर खान

या आठवड्यातील वीकेंड का वारमध्ये सलमान खानबरोबर गौहर खान देखील झळकणार आहे. गौहर खान आवेज दरबारला सपोर्ट करण्यासाठी येणार आहे. शोमध्ये ती काही स्पर्धकांचे कौतुक करताना दिसणार आहे, तसेच काहींवर टीकाही करणार आहे. या आठवड्यात आवेजचा खेळ सुधारल्याचं दिसतंय. तसेच गोहरदेखील शोमध्ये येणार आहे, त्यामुळे खरंच आवेज एलिमिनेट होणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.