सुम्बुल तौकीर खान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘इमली’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारुन सुम्बुल घराघरात पोहोचली. यंदाच्या ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वात सुम्बुल सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी ती एक होती. उत्तम खेळीने व दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सुम्बुलने १९व्या वर्षीच मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर सुम्बुलने घर घेतल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. मुंबईतील आलिशान घरात सुम्बुलने मित्रमैत्रीणींसाठी खास पार्टी आयोजित केली होती. शिव ठाकरेसह ‘बिग बॉस’मधील सेलिब्रिटींनी सुम्बुलच्या पार्टीला हजेरी लावली होती. याचे काही फोटो तिने शेअर केले होते. आता सुम्बुलने तिच्या आलिशान घरात इंटेरियर केलं आहे. व्हिडीओ शेअर करत सुम्बुलने घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

हेही वाचा>> “क्रिकेटर्स माझ्याकडे वाईट नजरेने…”, मंदिरा बेदीने क्रिकेट विश्वाबद्दल केलेला खुलासा, म्हणालेली, “त्यांना वाटायचं मी…”

सुम्बुलने इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या घरात आकर्षक सजावट केल्याचं दिसत आहे. इंटेरियरसह लँम्प व शोभेच्या वस्तूंनी सुम्बुलने तिच्या घरातील प्रत्येक कोपरा सजवला आहे. सुम्बुलच्या घरातील लिव्हिंग हॉलमध्ये सोफा सेट ठेवण्यात आला आहे. सोफ्याच्या वर सुम्बुलचा वडील व बहिणीबरोबरचा फोटो लावला आहे. याबरोबरच तिच्या या घरातील एक वॉल फोटोंनी डेकोरेट करण्यात आली आहे. सुम्बुलचे मालिका व वैयक्तिक आयुष्यातील खास फोटोंचं कोलाज या भींतीवर करण्यात आलं आहे.

हेही वाचा>> “माझं न्यूड फोटोशूट पाहून मित्राने फोन केला अन्…”, वनिता खरातने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तो फोटो फ्रेम करून…”

सुम्बुलसाठी घरात एक स्पेशल मेकअप रुमही तयार करण्यात आलं आहे. घरातील लिव्हिंग एरियातील भींतीवर मोठा टीव्हीही लावण्यात आला आहे. सुम्बुलच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame sumbul touqeer khan shared home tour video of her mumbai house kak