‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामधील सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाचं घरातील सदस्यांशी असणारं भांडण तर नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. पण याव्यतिरिक्त अपूर्वाचं घरातील काही सदस्यांशी मैत्रीचं नातं आहे. अक्षय, अमृता देशमुख यांच्याबरोबर ती नेहमीच गप्पा मारताना दिसते. आताही तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Video : “मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ” किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एन्ट्री, स्पर्धकांना त्यांची जागा दाखवणार

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती घरातील इतर सदस्यांबरोबर गार्डन एरियामध्ये बसलेली दिसत आहे. अपूर्वा अक्षय, अमृता देशमुख, विकास सावंत, स्नेहलता वसईकर यांच्याबरोबर गप्पा मारताना ती आई-वडिलांबाबत एक किस्सा सांगते.

अपूर्वा यावेळी तिच्या आई-वडिलांच्या हनिमूनबाबत उल्लेख करते. अपूर्वा म्हणते, “माझे आई-बाब काश्मीरला हनिमूनला गेले होते. त्यांच्याकडे चार बॅग होत्या. तर माझी आई दहा वेळा बाबांना सांगत होती की, नेमळेकर बॅगेवर लक्ष ठेवा.” यावर बाबा म्हणाले, “हो. लक्ष ठेवतोय मी.” इतक्यात दोघांनीही मागे वळून पाहिलं आणि एक बॅग चोरीला गेली असल्याचं त्यांना कळालं.

आणखी वाचा – “माझ्यावर खोटे आरोप…” विकास सावंतच्या वागण्याला कंटाळून ढसाढसा रडू लागली अपूर्वा नेमळेकर, नेमकं काय घडलं?

“चोरीला गेलेल्या बॅगेमध्ये माझ्या आईच्या बऱ्याच साड्या व बाबांचेही कपडे होते. या गोष्टीला इतकी वर्ष झाली आहेत तरीही प्रत्येक भांडणामध्ये हा विषय निघायचा.” असं अपूर्वा म्हणाली. तिच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.