बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदा चौथ्या पर्वात बिग बॉसची चावडी ही प्रत्येकाचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. प्रत्येक आठवड्यातील ही चावडी खास ठरत असते. मात्र या आठवड्यातील चावडी ही फारच गाजणारी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. याचे अनेक प्रोमो समोर आले आहे. यंदाच्या आठवड्यातील चावडीवर महेश मांजरेकरांनी किरण माने यांना खडे बोल सुनावले. त्याबरोबरच त्यांनी यशश्री मसूरकरचीही चांगलीच शाळा घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आठवडाभर खेळलेले टास्क, त्यावेळी केलेली गॉसिप्स, त्यांची वर्तवणूक हे पाहून महेश मांजरेकर चावडीवर त्यांना सुनावताना दिसतात. स्पर्धकांनी खेळलेल्या चुकीच्या खेळाबद्दल ते खरपूस समाचार घेतानाही ते पाहायला मिळतात. यंदा बिग बॉसच्या चावडीवर किरण मानेंपाठोपाठ यशश्रीला चांगलेच सुनावले.
आणखी वाचा : ‘तू कुणाची लायकी काढतोस?’ महेश मांजरेकरांनी किरण मानेंना खडसावले

महेश मांजरेकर हे यशश्रीला कॅप्टनसीच्या टास्कवरुन सुनावताना दिसत आहेत. यावेळी महेश मांजरेकर म्हणाले, त्यादिवशी त्याचं बोलणं मला पटलं. किरण माने म्हणाला की यशश्री उगाच कुरापती काढत होती. तू उगाच खुरापती काढत होती, हे किरण मानेचे बोलणं मला पटलं. अगदी खरं आहे. तो कॅप्टन का व्हावं याबद्दल सांगत होता. त्यावेळी तू त्याला बोलूही देत नव्हतीस. प्रत्येकवेळी किरण माने टार्गेट असू शकत नाही.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री, प्रोमो समोर

‘मी टार्गेट केलं नाही. मला त्यावेळी जे वाटलं ते मी बोलले’, असे यशश्रीने महेश मांजरेकरांना प्रत्युत्तर देताना म्हटले. त्यावर महेश मांजरेकर चांगलेच संतापले. त्यांनी माझ्या बोलण्याचं भांडवल करु नका, अशा शब्दात यशश्रीसह इतर सदस्यांची कानउघडणी केली.

“मी इथे आठवड्याभराचे जे निरीक्षण करतो ते सांगतो. माझ्या बोलण्याचं भांडवल करू नका. मी त्यांना त्यांच्या भल्यासाठी सांगतो. तुम्ही भांडवल करायचं म्हणून सांगत नाही. त्यादिवशी तो व्यवस्थित सांगत होता. दिसायला म्हणून उगाच तोंड खुपसू नका”, अशा शब्दात महेश मांजरेकरांनी यशश्रीला खडसावले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 mahesh manjrekar slams yashashri masurkar in the house play nrp