Nikki Tamboli Praise Arbaaz Patel : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्की आणि अरबाज यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली. ‘बिग बॉस’नंतर ही या दोघांनी आपलं नातं जपलं आहे. दोघे अनेकदा कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत. तसंच सोशल मीडियावरदेखील दोघे एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

अशातच निक्की अरबाजसाठी एक खास पोस्ट शेअर केला आहे. निक्कीने अरबाजसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ शेअर करण्याचं सुद्धा एक खास कारण आहे. ते कारण म्हणजे अरबाज Rise & Fall शोच्या अंतिम सोहळ्यात पोहोचला आहे. Rise & Fall शोच्या अंतिम सोहळ्यात पोहोचणारा तो पहिलाच स्पर्धक ठरला आहे. अरबाजच्या या कामगिरीबद्दल निक्कीने खास व्हिडीओ शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये निक्की-अरबाज दोघे गाडीत बसलेले दिसत आहेत. अरबाज गाडी चालवत असून निक्की त्याच्या बाजूला बसून ‘कहो ना प्यार है’ हे गाणं गुणगुणत आहे, तर अरबाजही तिला साथ देत आहे. या व्हिडीओसह निक्कीनं अरबाजचं कौतुकही केलं आहे. निक्की म्हणते, “एक स्त्री आपल्या भविष्यासाठी जोडीदाराला कायम साथ देते, Rise & Fall च्या अंतिम सोहळ्यात पोहोचल्याबद्दल अभिनंदन. तुझ्या मेहनतीनं तू सगळ्यांचीच मनं जिंकली आहेस.”

दरम्यान, निक्की Rise & Fall च्या नुकत्याच एका भागात सहभागी झाली होती. यावेळी तिनं अरबाजच्या खेळाबद्दल कौतुक केलं. तसंच तिनं खेळ नीट खेळण्यासाठी त्याला प्रोत्साहनही दिलं होतं. “आई, बाबा व आजीला तुझा अभिमान आहे. तूच या शोमधील नंबर वन स्पर्धक आहेस, हे मी सगळ्यांसमोर ठामपणे सांगते”, असं म्हणत निक्कीनं अरबाजला प्रोत्साहित केलं होतं. अशातच आता तिनं पुन्हा नव्या व्हिडीओद्वारे त्याचं कौतुक केलं आहे.

निक्कीने शेअर केला अरबाजबरोबरचा व्हिडीओ

निक्कीने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनीसुद्धा अरबाजचं कौतुक केलं आहे. तसंच त्याला Rise & Fall साठी शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच काही नेटकऱ्यांनी अरबाजला कायमच पाठींबा दिल्याबद्दल निक्कीचंसुद्धा कौतुक केलं आहे.