Bigg Boss Marathi 5 Winner Name Viral: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व १०० दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यंदाचे पर्व बिग बॉस मराठीच्या आधीच्या चार पर्वांपेक्षा खूप जास्त गाजले, पण तरीही हा शो लवकर संपणार आहे. या शोच्या ग्रँड फिनालेबद्दल (Bigg Boss Marathi 5 Grand Finale) नवनवीन अपडेट्स येत आहेत, अशातच या शोचा विजेता कोण असणार, याबाबत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस मराठीतून आतापर्यंत पुरुषोत्तमदादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोवा, आर्या जाधव, छोटा पुढारी घनश्याम दरोडे, वैभव चव्हाण, वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुले आणि अरबाज पटेल हे स्पर्धक बाहेर गेले आहेत. सध्या घरात वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार आणि अभिजीत सावंत हे सदस्य आहेत. या आठ सदस्यांपैकी विजेता कोण असणार, याबाबतचा एक फोटो चर्चेत आहे.

हेही वाचा – Urmila Matondkar Divorce: कोण आहे मोहसीन अख्तर मीर, काय करतो? जाणून घ्या

आठ सदस्यांपैकी वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार यांचे एलिमिनेशन होईल. तर निक्की तांबोळी चौथी रनर-अप असेल, जान्हवी तिसरी रनर-अप असेल, सूरज तिसऱ्या क्रमांकावर असेल. अंकिता व अभिजीत यापैकी एक विजेता असेल. तो म्हणजे गायक अभिजीत सावंत होय. हाउसमेट्स स्टेटस अशा आशयाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

हेही वाचा- “त्यांच्या वयाचा तरी विचार कर…”, वर्षा अन् अंकिताची खेचाखेची पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; तर निक्की म्हणाली, “किती घाणेरडा गेम…”

या फोटोत दिसतंय की ६३ व्या दिवशी डबल एविक्शन होईल, त्यात वर्षा उसगांवकर व पंढरीनाथ कांबळे बाहेर जातील. त्यानंतर ६८ व्या दिवशी धनंजय पोवार एलिमिनेट होईल. निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर व अभिजीत सावंत हे टॉप पाच सदस्य असतील. त्यापैकी अभिजीत विजेता ठरेल.

हेही वाचा – अरबाज पटेलविरोधात त्याची गर्लफ्रेंड पोलीस तक्रार करणार? म्हणाली, “तो चुकीचा माणूस…”

व्हायरल होणारा फोटो –

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो (सौजन्य – फेसबूक)

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पण त्यापूर्वी सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्याने विजेता आधीच ठरल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 winner name viral before grand finale suraj chavan abhijeet sawant ankita varsha usgaonkar hrc