Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनासह या पर्वाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्यांनी पहिलाच आठवडा गाजवला आहे. पहिल्या दिवसापासून सदस्य वेगवेगळी रणनीती करत आहेत. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून घरात वाद होतं आहेत. वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीचा वाद तर थांबायचं नावचं घेत नाहीये. निक्की सातत्याने वर्षा उसगांवकरांचा अपमान करताना दिसत आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारमंडळींसह नेटकरी निक्की तांबोळीवर टीका करत आहेत. तसंच घरातील इतर सदस्यांविषयी देखील चर्चा सुरू आहे. अशातच अभिजीत सावंतच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; ज्यामध्ये ‘डबल ढोलकी’ म्हणणाऱ्या सदस्यांना अभिजीत गाण्यातून उत्तर देताना दिसत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील घरात दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात नेहमी वाद होतं असतात. या गटातील काही सदस्यांना अभिजीत सावंतची भूमिका खटकत आहेत. त्यामुळे काही सदस्य त्याच्या मागून बोलत आहेत. कोणी त्याला ‘डबल ढोलकी’ म्हणत आहे. तर कोणी त्याला ‘पार्शल’ म्हणत आहेत. यालाच अभिजीतने गाण्यातून उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – Video: “देखो वो आ गया…”, अमेरिकेहून परतलेल्या संकर्षण कऱ्हाडेला पाहून अमृता खानविलकरची ‘अशी’ होती रिअ‍ॅक्शन, म्हणाली…

बिग बॉस मराठी

अभिजीत सावंतच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला लिहिलं आहे की, जेव्हा ते लोक माझ्या मागून माझ्याबद्दल गॉसिप करण्यात व्यग्र असतात. त्यानंतर अंकिता प्रभू वालावकर अभिजीतला ‘पार्शल’ म्हणताना दिसत आहे. मग निक्की तांबोळी त्याला ‘डबल ढोलकी’ म्हणताना पाहायला मिळत आहे. पण दुसऱ्याबाजूला अभिजीत गाणं गाण्यात व्यग्र आहे. या गाण्यातून तो अप्रत्यक्षरित्या ‘डबल ढोलकी’, ‘पार्शल’ म्हणणाऱ्या सदस्यांना उत्तर देत आहे. ‘कुछ तो लोग कहेंगे’, हे गाणं गाताना अभिजीत सावंत दिसत आहे.

अभिजीतच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “अभिजीतचा आवाज ऐकून निक्की थेट गप्प झाली.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अरे…हे असं होतं तर…माझ्या हे लक्षातच नाही आलं तेव्हा…परफेक्ट शॉट होता हा गाण्याच्या माध्यमातून…” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “खूप भारी.”

हेही वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात सूरज चव्हाणला मिळणाऱ्या वागणुकीवरून ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, “दोन्ही वेळेची भांडी…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील पहिल्याच आठवड्यात पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू वालावकर, पुरुषोत्तमदादा पाटील आणि सूरज चव्हाण या पाच जणांचं नाव सामिल आहे. त्यामुळे आता या पाच सदस्यांमधून कोण पहिल्याच आठवड्यात बेघर होतंय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.