Bigg Boss Marathi Arbaz Patel First Post : ‘बिग बॉस मराठी’च्या आठव्या आठवड्यात अरबाज पटेलने घराचा निरोप घेतला आहे. ‘बिग बॉस’चं पाचवं पर्व सुरू झाल्यावर पहिल्या दिवसापासून अरबाज आणि निक्कीची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत होती. रितेश देशमुखसह घरातील अन्य सदस्यांनी अनेकदा अरबाजला ‘निक्कीमुळे तुझा खेळ दिसत नाहीये’ असं त्याला स्पष्टपणे सांगितलं देखील होतं. मात्र, तरीही हे दोघे घरात एकत्र खेळत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात निक्की, अरबाज, वर्षा, सूरज आणि जान्हवी असे पाच सदस्य घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. मात्र, इतर सदस्यांच्या तुलनेत कमी मतं मिळाल्याने अरबाजला घराचा निरोप घ्यावा लागला. अरबाज एलिमिनेट झाल्यावर निक्की प्रचंड भावुक झाली होती. नेहमी सर्वांशी जोरजोरात भांडणारी निक्की जवळचा मित्र एलिमिनेट झाल्यावर ढसाढसा रडली. बाहेर जाताना अरबाजने “सगळी भांडणं विसरून निक्कीला साथ दे… ती आता एकटी आहे” अशी विनंती जान्हवीला केली. अरबाजचं घराबाहेर जाणं प्रत्येकासाठी धक्कादायक होतं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “बिग बॉसने निक्कीला गुलीगत धोका…”, अरबाज Eliminate झाल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस; वाचा भन्नाट प्रतिक्रिया

अरबाज स्वत: देखील घराबाहेर झाल्याने प्रचंड नाखूश होता. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. शिवाय या आठवड्यात तो घराचा कॅप्टन देखील झाला होता. मात्र, “कॅप्टन असून घरातून एलिमिनेट होणारा अरबाज हा ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील पहिलाच सदस्य ठरला आहे” असं बिग बॉसने सुद्धा जाहीर केलं. घराबाहेर आल्यावर अरबाज काय बोलणार, त्याची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वीच अरबाजने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

Bigg Boss Marathi Arbaz Patel First Post : अरबाज पटेलची पहिली पोस्ट

अरबाजने या पोस्टमध्ये निक्कीबरोबरचे एकूण सहा भावनिक फोटो शेअर केले आहेत. तो घरातून निरोप घेताना निक्की कशाप्रकारे बिथरली होती हे या फोटोंमधून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. याशिवाय अरबाजच्या कॅप्शनने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : अरबाज झाला Eliminate! निक्की ढसाढसा रडली…; Bigg Boss Marathi च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

अरबाजची घराबाहेर आल्यावर पहिली पोस्ट

अरबाजने घराबाहेर आल्यावर निक्कीबरोबर भावुक फोटो शेअर करत या फोटोंच्या कॅप्शनमध्ये, “हार्टब्रेक, भावुक झालेला इमोजी तसेच पुढे…कोमजलेल्या फुलाचा इमोजी” शेअर केला आहे. या कॅप्शनखाली अरबाजने ‘बिग बॉस मराठी’, ‘निक्की तांबोळी’ आणि ‘मिस्टर अरबाज पटेल’ असे हॅशटॅग वापरले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या पोस्टला अरबाजने ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘रांझा’ गाणं लावलं आहे.

आता ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यावर अरबाज खेळ व घरातील अन्य सदस्यांबाबत काय काय उलगडा करणार आणि घरात असलेली निक्की इथून पुढे कसा खेळ खेळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi arbaz patel first post after elimination shares emotional photos with nikki see caption sva 00