Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शंभर दिवसांऐवजी यंदा हा शो अवघ्या ७० दिवसांमध्ये संपणार आहे. पहिल्या दिवसापासून हा शो महाराष्ट्राच्या घराघरांत गाजला त्यामुळे एवढ्या कमी दिवसात हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सध्या सर्वत्र नाराजीचं वातावरण पसरलं आहे. अशातच गेल्या दोन आठवड्यांपासून भाऊच्या धक्क्याला सुद्धा ब्रेक लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दोन आठवड्यांपासून रितेश देशमुख कामानिमित्त परदेशात असल्याने भाऊचा धक्का पार पडलेला नाही. पहिल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्याऐवजी घरात पत्रकार परिषद पार पडली होती. तर, दुसऱ्या आठवड्यात घरात राखी सावंत, अनिल थत्ते, शरद उपाध्ये आणि अभिजीत बिचुकले यांनी एन्ट्री घेतली होती. मात्र, रितेशच्या अनुपस्थितीमुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. अनेकांनी अभिनेत्याने शो सोडला की काय…; असा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात स्वत: बिग बॉसने “रितेश कामानिमित्त बाहेरगावी आहेत त्यामुळे ते थेट ६ ऑक्टोबरला पार पडणाऱ्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहतील” असं सांगितलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi च्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट! स्पर्धक घराबाहेर येणार अन्…; पाहा व्हिडीओ

रितेश देशमुखवर नेटकरी नाराज

रितेश शूटिंगनिमित्त गेल्या काही दिवसांपासून परदेशात आहे. यानंतर २० दिवसांनी त्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी बाहेरगावी पोहोचले आहेत. रितेशने कुटुंबीयांसह एकत्र लाइव्ह मॅच पाहण्याचा आनंद यावेळी घेतला. जिनिलीयाने याचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पाडण्यात आला आहे.

रितेश गेले दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर नसल्याने नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या फोटोंवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. “बिग बॉस सोडून कुठे फिरताय?”, “शनिवार-रविवार मजा नाही येत”, “तुम्ही फिरत आहात आणि आम्ही भाऊच्या धक्क्यावर तुमची वाट बघतो”, “तुम्ही बिग बॉस मराठी सोडून खूप लोकांची मनं दुखावली आहेत” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या फोटोंवर दिल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “त्याला मोठं घर, बाथरुम वगैरे माहिती नव्हतं”, ‘बिग बॉस’साठी सूरज चव्हाणने दिलेला नकार; गावात जाऊन टीमने केलेली मनधरणी

Bigg Boss Marathi Season 5 : रितेश देशमुखवर नेटकऱी नाराज

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तत्पूर्वी घरात मिडवीक एलिमिनेशन पार पडणार आहे. आता टॉप-५ मध्ये कोण प्रवेश करणार आणि यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi netizens upset due to riteish deshmukh not coming for bhaucha dhakka for last 2 weeks sva 00