Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाचा सीझन केवळ ७० दिवसांत संपणार आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच ‘बिग बॉस’कडून करण्यात आली आहे. आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या खेळात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या शोमधील प्रत्येक सदस्याची चर्चा होत आहे. एकूण दहा आठवडे हे पर्व सुरू राहील त्यानंतर ६ ऑक्टोबर हा शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. सध्या घरात नवव्या आठवड्याचा खेळ सुरू आहे. यानिमित्त ‘बिग बॉस’कडून सदस्यांना एक हटके टास्क देण्यात आला आहे. हा टास्क ऐकताच सगळ्यांना धक्का बसल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : “निक्कीला खूप चांगली कानाखाली…”, जयने केली Bigg Bossची नक्कल, आर्याची फिरकी घेत म्हणाला…; पाहा व्हिडीओ

सदस्यांना बसला धक्का

‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) सांगतात, “या आठवड्यात आपल्यातील काही सदस्य ठरतील सांगकामे आणि उर्वरित सदस्य असतील त्यांचे मालक…आणि मालकांनी सांगितलेली सगळी कामं अगदी वैयक्तिक कामंही सांगकाम्यांना करावी लागणार आहेत.” ही घोषणा ऐकताच निक्की “ओह माय गॉड…हे खूपच भयानक आहे” असं म्हणताना दिसली. तिने टास्क ऐकल्यावर ‘बिग बॉस’समोर थेट हातच जोडले. तर, अभिजीत, अंकिता आणि जान्हवीने हा टास्क ऐकून डोक्यावर हात मारल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : घरातील सगळे ८ सदस्य झाले Nominate! ‘बिग बॉस’ने दिला मोठा धक्का, काय आहे कारण?

Bigg Boss Marathi : सदस्यांनी मारला डोक्यावर हात

हेही वाचा : Bigg Boss Marathi ठरलं! ‘बिग बॉस’चे दोन्ही सीझन एकमेकांना भिडणार, मराठीचा महाअंतिम सोहळा अन् हिंदीचा ग्रँड प्रीमियर, तारीख जाहीर…

एकंदर ‘सांगकाम्या आणि मालक’ हा अनोखा टास्क ( Bigg Boss Marathi ) ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते. त्यामुळे आता घरात नवीन काय कल्ला होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पाचवा सीझन अंतिम टप्प्यात आल्याने घरातील सर्व सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. आता या आठ जणांमध्ये कोण बाजी मारत टॉप – ५ पर्यंत पोहोचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi new task for housemate nikki tamboli reaction grabs attention sva 00