Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. आता घरात एकूण १२ सदस्य असून ‘ए’ ग्रुपच्या मैत्रीमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. खेळ सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. ग्रँड प्रीमियरलाच निक्की तांबोळीने रितेश देशमुखसमोर आपण अरबाज पटेलवर फिदा झाल्याचं सांगितलं होतं. यानंतर सर्वत्र यांच्या मैत्रीच्या चर्चा रंगल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक्की आणि अरबाज पहिल्या दिवसापासून शोमध्ये एकत्र खेळत आहेत. पण, नुकत्याच प्रसारित झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्कीला तिच्या मागून घरात काय-काय बोललं जातं याच्या क्लिप्स दाखवल्या होत्या. अरबाज सुद्धा यामध्ये सामील असल्याने निक्की त्याच्यावर प्रचंड संतापली. यापुढे मी ‘ए’ ग्रुपमध्ये नसेन असं सांगत निक्कीने आपल्या मित्रमंडळींच्या टीममधून एक्झिट घेतली. निक्की व अरबाजमध्ये दुरावा आल्याने सध्या घरात त्यांचे प्रचंड वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : प्रेक्षकांमध्ये चर्चेत असलेले ‘हे’ चार सदस्य झाले नॉमिनेट! पण, यंदा आहे ‘हा’ मोठा ट्विस्ट

पुष्कर जोगची संतप्त प्रतिक्रिया

निक्की व अरबाज यांच्या वैयक्तिक भांडणाचा संपूर्ण घरावर परिणाम होत आहे. अरबाजने नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सर्वत्र तोडफोड केल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या प्रकारावर आता अभिनेता पुष्कर जोगने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तो लिहितो, “सर्वप्रथम हा शो म्हणजे निक्की-अरबाजची लव्हस्टोरी नाही. त्यामुळे डिअर कपल प्लीज यातून बाहेर पडा. अन्य सदस्यांना सुद्धा आपला गेम खेळायचाय.”

पुढे, अरबाजने घरात भांडी फोडून आदळआपट केल्याबद्दल पुष्कर लिहितो, “हे असं वागणं योग्य आहे का? अशा पद्धतीने आक्रमक होणं ही अगदी निंदनीय प्रकारची वागणूक आहे. ‘बिग बॉस’ प्लीज मला घरात जायची परवानगी द्या. घरात असं वागण्यापूर्वी इतर महिलांचा विचार सुद्धा केला पाहिजे. या अशाप्रकारच्या वागणुकीमुळे काही जणी घाबरू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्यातरी पुरुष सदस्याने या विरोधात स्टॅण्ड घेणं गरजेचं आहे.”

हेही वाचा : ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार! ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका, पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi : पुष्कर जोगची पोस्ट

हेही वाचा : पहिल्या नजरेत प्रेम, हिरोने लपवली ओळख अन्…; २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ रोमँटिक चित्रपट! आजही प्रत्येक गाणं आहे सुपरहिट

Bigg Boss Marathi : पुष्कर जोगची पोस्ट

दरम्यान, या आठवड्यात अभिजीत, अंकिता, वर्षा आणि निक्की या चार सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. परंतु, ‘बिग बॉस’च्या टीमकडून व्होटिंग लाइन्स बंद ठेवण्यात आल्यामुळे आता या रविवारी भाऊच्या धक्क्यावर कोणीही घराचा निरोप घेणार नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi pushkar jog angry post for arbaz nikki love story sequence sva 00