Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा नवीन कॅप्टन अरबाज पटेल झाला आहे. परंतु, हा टास्क निक्की आणि टीमसाठी एवढा सोपा नव्हता. कॅप्टनसीसाठी यंदा घरात ७ जण दावेदार ठरले होते. निखिल, योगिता, सूरज, घन:श्याम, निक्की, जान्हवी आणि अरबाज या सात जणांमध्ये कॅप्टनपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अखेर सूरज अन् योगिताला बाद करत निक्कीच्या टीमने या खेळात बाजी मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक्की, अरबाज आणि जान्हवी हे त्रिकुट एकाच टीममध्ये असल्याने हा टास्क ग्रुपमध्ये खेळला जाणार याची जाणीव प्रत्येकाला होती. त्यात सूरज आणि योगिता घरात इतरांपेक्षा तुलनेने जास्त शांत असतात. त्यामुळे हे दोघे हा टास्क कसा खेळणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं होतं. अखेर टास्क सुरू झाल्यावर पहिल्याच डावात योगिताचं वेगळं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळालं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : अरबाज पटेल झाला नवा कॅप्टन! पण, कौतुक होतंय ‘गुलीगत धोका’ म्हणणाऱ्या सूरज चव्हाणचं! नेमकं काय घडलं?

नवऱ्याने केलं योगिताचं कौतुक

योगिताने फ्रेंच फ्राइस टास्कमध्ये निक्की आणि जान्हवीला जोरदार टक्कर दिली. योगिताला ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच बेधडकपणे खेळताना पाहून तिचा पती अभिनेता सौरभ चौघुलेने सुद्धा तिचं कौतुक केलं आहे. “फ्लॉवर समझे क्या…फायर है…फायर है!” असं सौरभने ‘बिग बॉस’चा प्रोमो शेअर करत म्हटलं आहे. तर या प्रोमोवर त्याने “चला आता वाट मोकळी करा” अशी कमेंट केली आहे.

Bigg Boss Marathi : सौरभ चौघुलेची पोस्ट

हेही वाचा : Munjya on TV: सुपरहिट ‘मुंज्या’ OTT नव्हे तर टीव्हीवर होतोय प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

सौरभ चौघुलेची होणार Wild Card एन्ट्री ?

सौरभने ‘वाट मोकळी करा’ अशी कमेंट करताच सोशल मीडियावर ‘बिग बॉस’च्या घरात त्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या कमेंटवर “Wild Card म्हणून घरात ये” अशा प्रतिक्रिया सौरभच्या कमेंटवर दिल्या आहेत. योगिताने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यावर काही आठवड्यातच बाहेर जाण्याची मागणी केली आहे. तसेच लवकरात लवकर मला बाहेर काढा असंही अभिनेत्रीने मेकर्सला सांगितलं आहे. त्यामुळे येत्या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर नेमका काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, या आठवड्यात घराबाहेर ( Bigg Boss Marathi ) होण्याच्या प्रक्रियेसाठी योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निखिल दामले हे सदस्य नॉमिनेट आहेत. आता यांच्यापैकी कोण बेघर होणार हे आपल्याला रविवारी ( १८ ऑगस्ट) समजणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi saorabh choughule praises wife yogita chavan for killer performance sva 00