‘बिग बॉस’ चे १७ वे पर्व सध्या चालू आहे. या लोकप्रिय शोचा एक मोठा चाहता वर्ग आहे, परंतु इतक्या वर्षांनंतरही चाहत्यांना हे माहीत नाही की शोमधील बिग बॉस नक्की कोण आहे. तसेच शोमधील बिग बॉसचा आवाज कोणते स्पर्धक घरात राहतील आणि कोणते बाहेर पडतील, हे ठरवत नाहीत, तर प्रेक्षक ठरवतात पण लोकांना वाटतं की तो बिग बॉसचा आवाज हे सगळं ठरवतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय विक्रम सिंह हे या शोचे निवेदक आहेत. ते या शोमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधतात. त्यांनी ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. दोन वर्षात एका लोकप्रिय स्पर्धकाला बाहेर काढल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक धमक्या आल्या, असं त्यांनी सांगितलं. “मी लोकांना सांगतो की बिग बॉसमध्ये दोन आवाज आहेत, पण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी प्रेक्षकांशी संवाद साधणारा आवाज आहे, घरातील स्पर्धकांशी संवाद साधणारा आवाज नाही. स्पर्धकांशी संवाद साधणारा आवाज हा वेगळा आवाज आहे. मी लोकांना सांगत असतो की मी शोमध्ये निवेदकाचा आवाज आहे,” असं विजय म्हणाले.

“मी त्याला दिलीप नावाने…”, सुरेश वाडकरांचे एआर रहमान यांच्याबद्दल विधान, ‘त्या’ वादानंतर दोघांनी कधीच एकत्र केलं नाही काम

विजय यांनी सांगितलं की एका लोकप्रिय स्पर्धकाला बाहेर काढल्यानंतर गेल्या दोन वर्षांत त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं. “एका स्पर्धकाला शोमधून काढल्यामुळे गेल्या दोन वर्षांत माझ्याशी अनेक वेळा ऑनलाइन गैरवर्तन करण्यात आले. मी त्यांना सांगत राहिलो की मी त्यांना शोमधून बाहेर काढत नाही, हे लोकांची दिलेल्या मतांच्या आधारे होतं. पण लोकांनी माझ्या कुटुंबालाही या सगळ्या प्रकरणात ओढलं आणि ते त्यांनाही धमक्या देऊ लागले. खरं तर मी तो आवाज नाही जो स्पर्धकांना घराबाहेर जायला सांगतो,” असं ते म्हणाले.

एका रात्रीत ‘या’ कामातून २० ते ३० लाख रुपये कमावतो ओरी; खुलासा करत म्हणाला, “माझ्या स्पर्शानंतर…”

विजय म्हणाले की ते बिग बॉसचा आवाज नाही. ते फक्त दुसरा आवाज आहेत, जो बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या घडामोडी सांगतो, तसेच कोणत्या वेळेत घरात काय घडलं, त्याची माहिती देतो. बिग बॉसचा आवाज खरंच एखाद्या व्यक्तीचा आहे की ती मशीन आहे, याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. जर तो आवाज एखाद्या व्यक्तीचा असेल तरी ती फक्त आपलं काम करत आहे, असं विजय यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss narrator vijay vikram singh says people abuse him online for this reason hrc