Shreya Bugde Visit Kuldevi Shantadurga Temple : दिवाळी हा सण सुखाचा, आनंदाचा आणि आपुलकीचा सण आहे. दिवाळीच्या या सणात बरेच जण आपल्या कुटुंबासह, नातेवाईकांबरोबर दिवाळी साजरी करततात. अनेकजण दिवाळीनिमित गावी जातात, देवदर्शन करतात. सामान्यांबरोबरच कलाकार मंडळीसुद्धा दिवाळीच्या सणात गावी जात देवदर्शन करतात. अशातच लोकप्रिय अभिनेत्रीही कुलदेवीच्या दर्शनासाठी गेली आहे.
दिवाळी सणाची शोभा जरी फटाके, रांगोळी, फराळ, दिव्यांच्या रोषणाईत असली; तरीही आपल्या आपुलकीच्या माणसांबरोबर हा सण साजरा करण्यात काही वेगळाच आनंद असतो. अशातच अभिनेत्री श्रेया बुगडेही आपल्या माणसांबरोबर कुलदेवीच्या दर्शनासाठी गेली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोच्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय झालेली श्रेया सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते.
श्रेया सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. सोशल मीडियावर तिचा बराच चाहतावर्गही आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेया चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिनं दिवाळीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून तिनं कुलदेवीच्या दर्शनाला गेल्याचं सांगितलं आहे. श्रेया आई-वडील आणि नवऱ्यासह कुलदेवीच्या दर्शनाला गेली आहे.
‘या’ ठिकाणी आहे अभिनेत्री श्रेया बुगडेच्या कुलदेवीचं मंदिर
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोनुसार, श्रेयाची कुलदेवी गोव्यात आहे. गोव्यातील नानोडा या ठिकाणी श्रेयाची कुलदेवी आहे आणि शांतादुर्गा असं या कुलदेवीचं नाव आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत देवीचं भव्य मंदिर पाहायला मिळत आहे. देवीसाठी श्रेयाने जास्वंदीचं फूल अर्पण केलं. ‘दिवाळी पाडवा’ अशी कॅप्शन देत श्रेयाने हे खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
अभिनेत्री श्रेया बुगडेने शेअर केले कुलदेवीच्या दर्शनाचे फोटो
दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोला श्रेयाच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच अनेकांनी तिला दिवाळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. श्रेयाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती सध्या ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात तिच्यासह गौरव मोरे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि प्रियदर्शन जाधवही आहे.