मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांचा शाही विवाहसोहळा पार पडला; तर ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता चेतन वडनेरे याने ऋजुता धारप हिच्याशी काल लग्नगाठ बांधली. या जोडीने त्यांच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत या फोटोंना ‘कुर्यात सदा मंगलम्’ असं कॅप्शन दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेतन-ऋजुताच्या जुन्या मुलाखतीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चेतन आणि ऋजुताची पहिली भेट ‘फुलपाखरु’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. पहिल्याच भेटीच्या वेळी ऋजुताच्या नावावरून एक किस्सा घडला होता, तो चेतनने या मुलाखतीत शेअर केला आहे.

हेही वाचा… क्रांती रेडकरने बाप-लेकीच्या नात्याचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर; म्हणाली, “ती घाबरू नये म्हणून…”

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत चेतन म्हणाला होता, “पहिल्यांदा जेव्हा मला ऋजुता भेटली तेव्हा मी तिला तुझं नाव काय? असं विचारलं होतं. कारण आम्ही सीनला चाललो होतो आणि सेटवर आमच्याकडे व्यवस्थित ओळख वगैरे करून द्यायची अशी पद्धत नव्हती. तिचा आणि माझा सीन होणार होता म्हणून मी तिला माझी ओळख स्वत:हून करून दिली.”

चेतन पुढे म्हणाला, “मी तिला म्हटलं, हॅलो मी चेतन, मग ती म्हणाली मी ऋजुता. मी म्हटलं, वाह छान नाव आहे. तिला वाटलं आता हा मुद्दाम माझ्या नावाची मस्करी करतोय. याचा असा स्वभावच दिसतो आहे. मी तिला म्हणालो, खूप छान नाव आहे तुझं. मग ती म्हणाली, खूप छान आहे का? उगाच आपलं काहीतरी बोलू नकोस.”

हेही वाचा… “मला रोज फोन करतायत”, केदार शिंदे करतात निलेश साबळेला दररोज फोन, म्हणाला…

“लहान असताना ऋजुता देशमुख हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं होतं. तेव्हा म्हटलं होतं, ऋजुता मस्त नाव आहे आणि त्यानंतर भेटलेली ही ऋजुता. मध्ये कुठल्याचं ऋजुताच नाव मी ऐकलं नव्हतं. मग मी तिला हे सगळं सांगितलं की, हे मी तेव्हा ऐकलेलं आणि मला वाटलेलं हे वेगळं नाव आहे असं तसं.”

हेही वाचा… “यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”, मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टच म्हणाला…

“माझ्या नावाचं तसं काही नाही आहे. माझं चेतन नाव सोप्प म्हणजे माझ्या कुंडलीत खाली असं लिहिलं होतं. ‘च’, ‘चे’ या अक्षरावरून काहीतरी नाव ठेवा. उदाहरणार्थ-चेतन. तर माझ्या घरच्यांनी चेतन हेच नाव ठेवलं. अजिबात कष्ट घेतले नाहीत, तेच नाव ठेवलं.”

हेही वाचा… “एकापेक्षा एक नमुने…”, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रींचा कॉमेडी व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…

दरम्यान, ‘फुलपाखरु’च्या सेटवर भेटल्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झालं आणि मैत्रीट रुपांतर नंतर प्रेमात झालं. गेल्यावर्षी १९ डिसेंबर २०२३ रोजी दोघांनी मित्र-मैत्रिणी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुपचूप साखरपुडा उरकला होता. तर २२ एप्रिल २०२४ रोजी या जोडीचा लग्नसोहळा नाशिक येथे पार पडला. चेतन ‘फुलपाखरु’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘काय घडलं त्या रात्री’, ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ या मालिकांमध्ये दिसला होता; तर ऋजुताने ‘आई माझी काळुबाई’ मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chetan vadnere rujuta dharap married actor shared their first meet and name story dvr