मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर अभिनयासह निर्मातीदेखील आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरने २०१७ मध्ये सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबरोबर लग्न केलं. या जोडप्याला झिया आणि झायदा अशा दोन मुली आहेत आणि क्रांती त्यांना प्रेमाने छबील आणि गोदो अशी हाक मारते.

अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि तिच्या लेकींचे फोटोज, व्हिडीओज शेअर करत असते. पण, क्रांतीने नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ बाबा-लेकीच्या नात्याचा आहे. आज ‘फादर्स डे’ वगैरे काही नाही, परंतु आयुष्यात कधी अशा गोष्टी घडतात ज्या कायम लक्षात राहतात. असाच एक क्षण क्रांतीने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

Dhruv Rathi
युट्यूबर ध्रुव राठीला जीवे मारण्याची धमकी; एक्स पोस्टवर म्हणाला, “या सगळ्यामागे…”
Putin, Putin news, Russia,
विश्लेषण : रशियात एकामागून एक लष्करी सेनापतींना पुतिन बडतर्फ का करत आहेत? भ्रष्टाचाराबद्दल की आणखी काही कारण?
sambit patras
“भगवान जनन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त”; संबित पात्रांच्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता!
Godfather of artificial intelligenceGeoffrey Hinton
‘एआयकडून मानवी अस्तित्वाला धोका’, ‘AI’चे जनक डॉ. जेफ्री हिंटन का व्यक्त केली चिंता?
young man was brutally beaten in Kalyan due to dispute over teasing on Instagram
इन्स्टाग्रामवर चिडविल्याच्या वादातून कल्याणमध्ये तरूणाला बेदम मारहाण
KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video
IPL 2024: रोहित शर्मा-अभिषेक नायर ‘त्या’ व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय बोलत होते? KKR च्या सीईओने केला खुलासा
Bengaluru metro video
Viral Video : बंगळुरू मेट्रोमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, पोलिसांनी घेतली दखल; म्हणाले…
Goldy Brar
अमेरिकेतील गोळीबारात गोल्डी ब्रारचा मृत्यू? पोलीस म्हणाले, “मारला गेलेला व्यक्ती…”

हेही वाचा… सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अर्पिता खान पोहोचली निजामुद्दीन दर्ग्यात; व्हिडीओ व्हायरल

क्रांतीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर तिने लिहिलं, “आम्ही विमानात होतो आणि आम्हाला विमान हलताना (टर्ब्युलन्स) जाणवलं. आमची मुलगी गोदो समीरच्या बाजूला बसली होती. ती घाबरू नये म्हणून तो तिच्याशी मुद्दाम, ठरवून गप्पा मारत राहिला. हेच वडील करतात. ते ढाल बनतात, एक भिंत बनतात, जी प्रत्येक वादळापासून त्यांच्या मुलांचे रक्षण करते. हे जगातल्या सगळ्या वडिलांसाठी तुम्ही खूप चांगलं काम करताय.

या व्हिडीओला कॅप्शन देत क्रांतीने लिहिलं, “ज्या गोष्टींना महत्त्व आहे त्याचे असे लहान व्हिडीओ काढायला मला खूप आवडतात. माझ्या फोनच्या गॅलरीत ते आहेत. जेव्हा माझा स्वत:चा वेळ असतो, तेव्हा मी ते व्हिडीओज पाहते. हे माणसांचे खरे खुरे क्षण आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत. हे क्षण निरागस आणि कोमल आहेत, असे क्षण जे चिरंतन बंध निर्माण करतात. त्यामुळे सर्व वडिलांना माझ्याकडून चिअर्स.”

हेही वाचा… “यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”, मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टच म्हणाला…

दरम्यान, क्रांती रेडकरच्या कामाबाबत सांगायचे झाले, तर क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हितेन पटेल, ऋषी सक्सेना, ऊर्मिला कोठारे, प्रसाद ओक अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.