मागील काही दिवसांपासून मालिकाविश्वातील बऱ्याच मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काही मालिका टीआरपीच्या गणितामुळे अचानक बंद करण्यात आल्या आहेत. तर काही मालिकांच कथानक पूर्ण झाल्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेतला आहेत. काही दिवसांपूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही लोकप्रिय मालिका ऑफ एअर झाली. त्यानंतर आता आणखी एक मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “सुप्रिया ताई…” दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले…

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जीव माझा गुंतला’ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. अलीकडेच या मालिकेनं ७०० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला होता. पण आता ही मालिका ऑफ एअर होणार आहे. याबाबत मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

हेही वाचा – “मराठी माणसाने पाय खेचण्याची वृत्ती सोडली पाहिजे”, कोकण हार्टेड गर्ल स्पष्टच बोलली; म्हणाली…

‘जीव माझा गुंतला’ मधील मल्हार खानविलकर म्हणजे अभिनेता सौरभ चौघुलेनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यान स्वतःचा सेल्फी शेअर करत लिहीलं आहे की, “उद्या (आज) ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेचा शेवटचा भाग असणार आहे. तुम्ही भरभरून दिलेल्या प्रेमाला मल्हार खानविकरचा सलाम.” तसेच मालिकेतील इतर कलाकार मंडळींनी देखील यासंबंधित इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

हेही वाचा – ‘ताली’ सीरिजला एक महिना पूर्ण, छोट्या गौरी सावंतनं सादर केली अप्रतिम कलाकृती, व्हिडीओनं वेधलं लक्ष

हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने नाना पाटेकरांची घेतली भेट, अनुभव सांगत म्हणाली, “इतका साधेपणा…”

दरम्यान, ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या मालिकेतील मल्हार आणि अंतराची जोडी प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली. पण काही महिन्यांपूर्वी मालिकेचा ट्रॅक कंटाळवाणा झाल्यामुळे टीआरपीवर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे तेव्हापासून मालिका बंद होणार असल्याचा चर्चां सुरू झाल्या होत्या. अखेर आज या मालिकेचा शेवट होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi jeev majha guntala serial will be going off air today is last episode pps