Ajit Pawar comment on Suraj Chavan New Home : सूरज चव्हाणने नवीन घरात प्रवेश केला आहे. बारामतीजवळच्या मोढवे गावातील सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचं वचन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं होतं. त्यांनी ते वचन पूर्ण केलं आहे. सूरज चव्हाणच्या घराचं बांधकाम पूर्ण झालं असून आता तो या घरात राहायला गेला आहे. सूरजच्या घरानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सूरज चव्हाणने गृहप्रवेशाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अजित पवारांनी कमेंट केली आहे. त्यांनी सूरजला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“सूरज, नवीन घरासाठी आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा!” अशी कमेंट सूरज चव्हाणच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अजित पवारांनी केली आहे.

पाहा पोस्ट

अजित पवारांची कमेंट (सौजन्य- इन्स्टाग्राम)

दरम्यान, सूरज चव्हाणने चार दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. अजित पवारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सूरज चव्हाणच्या भेटीचे व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. “बारामतीचा सुपुत्र आणि बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण यानं आज माझी सदिच्छा भेट घेतली. त्याच्या नवीन घराचं बांधकाम उत्तमरित्या पार पडत असून त्याबद्दल त्यानं माझ्याकडे समाधान व्यक्त केलं. यावेळी सुरजला पुढील वाटचालीसाठी, आयुष्यातील नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या,” असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.