‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी लग्नबंधनात अडकल्यापासून चर्चेत आहे. धर्माने मुस्लीम असलेल्या बॉयफ्रेंड शाहनवाजशी विवाहबद्ध झाल्यामुळे देवोलिनाला ट्रोल केलं जात आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आफताबशीही तिच्या पतीची तुलना करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नात पतीने खर्च केला नाही ते लग्नाआधीच गरोदर असल्याच्या चर्चा देवोलिनाच्या विवाहानंतर रंगलेल्या दिसल्या. देवोलिनाने लग्नानंतरचा पहिलाच नाताळ सण पती शाहनवाज व तिच्या कुटुंबियांसह साजरा केला. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते. लाल रंगाचा टॉप व जीन्समध्ये नाताळासाठी देवोलिनाने खास लूक केला होता. परंतु, भांगेत कुंकू न लावल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला पुहा ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> “मी तुझ्यावर प्रेम करतो”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकच्या नवऱ्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

हेही पाहा>> “तिच्यामुळे शीझान खानचं करिअरही…”, तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्याचं ट्वीट

देवोलिनाच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “कुंकू कुठे आहे?”, असा प्रश्न चाहत्यांनी कमेंटमध्ये विचारला आहे. अनेकांनी शाहनवाजला ट्रोलही केलंही आहे.  “काही वेळ गेल्यानंतर तू पुढची तुनिषा शर्मा असणार आहेस”, अशी कमेंटही एकाने केली आहे.

हेही वाचा>> Photos: तुनिषा शर्माने शूटिंगदरम्यानच केली आत्महत्या; मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं?

देवोलिना व शाहनवाज १४ नोव्हेंबर २०२२ रोजी कोर्ट मॅरेज करत विवाहबद्ध झाले. ‘गोपी बहू’ भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळविलेल्या देवोलिनाचा पती शाहनवाज एक फिटनेस ट्रेनर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devoleena bhattachajee troll for not wearing sindoor netizens compare her with tunisha sharma kak