अभिनेता नितीश चव्हाण लवकरच ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येणार आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे हिची निर्मिती असलेल्या ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेतून नितीश प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पण नितीशबरोबर कोणती अभिनेत्री पाहायला मिळणार हे माहित आहे का? तर जाणून घ्या…

काही दिवसांपूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीवर येणाऱ्या ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरात झळकणार असल्याचं समोर आलं होतं. ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील संजीवनीची मैत्रीण आणि ‘मन झालं बाजिंद’ मधील कृष्णा म्हणून काम केलेली श्वेता व नितीश यांची नवी जोडी पाहायला मिळणार असल्याचं ‘मराठी टीव्ही इन्फो’ इन्स्टाग्राम पेजवर सांगण्यात आलं होतं. पण आता श्वेताच्या ऐवजी दुसरी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झळकणार असल्याच समोर आलं आहे.

हेही वाचा – Video: भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाआधीच्या कार्यक्रमांना पारंपरिक पद्धतीत झाली सुरुवात, पाहा व्हिडीओ

काही महिन्यांपूर्वी ही प्रसिद्ध अभिनेत्री पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात पूजा सावंत, पुष्कर जोशबरोबर ही अभिनेत्री दिसली होती. मिथिलाची भूमिका तिने साकारली होती. आता ही प्रसिद्ध अभिनेत्री कोण असेल? हे थोडं फार लक्षात आलंच असेल. ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून दिशा परदेशी आहे.

अभिनेत्री दिशा परदेशी ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत नितीशबरोबर पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात ‘मराठी टीव्ही इन्फो’ इन्स्टाग्राम पेजवर माहिती देण्यात आली आहे. ‘झी मराठी’ वाहिनी आता नव्या रुपात अन् नव्या ढंगात आली आहे. याच्याच प्रोमोमध्ये नितीशबरोबर दिशा पाहायला मिळाली. त्यामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत नितीश व दिशा ही नवी जोडी दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – Video: सागरने स्वतः मुक्ताला सांगितलं तिच्या आईच्या अपघातामागच्या खऱ्या आरोपीचं नाव, माधवी-पुरुला बसला धक्का

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत नितीश सूर्यादादाच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या सूर्यादादाच्या चार बहिणी कोण असणार? याचा खुलासा नव्या प्रोमोमधून झाला होता. सूर्यादादाच्या चार बहिणींची नावं तेजश्री, राजश्री, भाग्यश्री आणि धनश्री अशी आहेत. अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी बहिणींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अद्याप ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेची सुरू होण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. पण मालिकेच्या दमदार प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.