GharoGhari Matichya Chuli Promo : ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत नुकताच मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळालं. ऐश्वर्याचं हृषिकेशबरोबर लग्न करण्याचं स्वप्न जानकी मोडून काढते. त्यानंतर जानकी ऐश्वर्याला रणदिवे कुटुंबाच्या घराबाहेर काढते. परंतु, तरीसुद्धा ऐश्वर्याला अद्दल घडलेली नसते, त्यामुळे ती कोर्टात जाते.

सौमित्र कोर्टात जानकीची बाजू मांडतो. तिच्यावर तिच्या आईला पाण्यात ढकलून मारण्याचा आरोप असतो, याबद्दलचे खोटे पुरावे कोर्टात सादर करण्यात आलेले असातत. पण, हा सगळा ऐश्वर्याचा डाव असतो. जानकीला अडकवण्यासाठी ती तिच्यावर आरोप करत असते. कोर्टात जानकी त्या रात्री नेमकं काय घडलं याबद्दल सगळं स्पष्ट सांगते. अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये ऐश्वर्याचा काटा काढण्यासाठी जानकी मास्कमनच्या वेशात तयार झालेली दिसते.

ऐश्वर्याकडून पुरव्यांची फाईल मिळवण्यासाठी जानकी घेणार मास्कमनचं रूप

समोर आलेल्या नवीन प्रोमोमधून ऐश्वर्या अवंतिकाला जिवे मारेन या भीतीने सौमित्र त्याच्याकडे असलेले सर्व पुराव्यांची फाईल तिला देतो. पण जानकी ऐश्वर्याकडून ती फाईल मिळवण्यासाठी मास्कमनचं रूप घेऊन तिच्याकडे जाताना दिसतं.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये हृषिकेश सौमित्रची कॉलर धरतो आणि त्याला “पुराव्याची फाईल ऐश्वर्याला का दिलीस” असा जाब विचारतो. त्यावर जानकी “तसं नसतं केलं तर अवंतिकाचा जीव घेतला असता त्या ऐश्वर्याने” असं म्हणते. पुढे हृषिकेश तिला आता पुराव्यांची फाईल परत कशी मिळवणार असं विचारतो.

हृषिकेशने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत जानकी त्याला म्हणते, “जर काट्याने काटा काढायचा असेल तर जो कोणी मास्कमन ऐश्वर्याची मदत करतोय त्याच्या सारखं व्हावं लागेल.” पुढे ऐश्वर्या जानकीला मास्कमन समजून “हे घे माझ्याविरोधात असलेल्या पुराव्यांची फाईल, ठरल्याप्रमाणे मला ५० कोटी मिळायला हवे यात काही फसवा फसवी नको” असं म्हणताना दिसते.

जानकी पुढे ऐश्वर्याला “दिसतं तसं नसतं म्हणूनच तर जग फसतं ऐश्वर्या” असं म्हणते आणि चेहऱ्यावरचा मास्क काढून तिचा चेहरा दाखवते. त्यानंतर ऐश्वर्याला जानकीला तिथे पाहून धक्का बसतो आणि ती तिला “जानकी तू…” असं म्हणताना दिसते. अवंतिकाचा जीव वाचवण्यासाठी ऐश्वर्याला सौमित्रने दिलेली पुराव्यांची फाईल जानकीने परत मिळवल्याचे प्रोमोमधून पाहायला मिळते.

ऐश्वर्याकडून पुराव्यांची फाईल मिळवल्यानंतर आता पुढे काय घडणार, जानकी गुन्हेगार नसल्याचं सिद्ध होईल का? की ऐश्वर्या पुन्हा कोणती खेळी खेळणार हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.