Gharoghari Matichya Chuli upcoming twist: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. ऐश्वर्या रणदिवे कुटुंबाविरुद्ध कट करत आहे, तर जानकी-हृषिकेश हे अवंतिका-सोहम यांच्या मदतीने ऐश्वर्याचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

ऐश्वर्याने जानकीच्या आईला किडनॅप केले आहे. तसेच हृषिकेशबरोबर लग्न करण्याची मागणी केली आहे. तसे केले नाही तर जानकीच्या आईला जीवे मारले जाईल असे सांगितले आहे, त्यामुळे हृषिकेश लग्नासाठी तयार झाला. ऐश्वर्याचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी जानकी व हृषिकेश एकत्र आले आहेत. जानकी-हृषिकेश हे अवंतिका-सोहम तसेच सारंग यांनी एकत्र येत मोठी योजना आखली आहे. त्यानुसार सारंगचे निधन झाले आहे, असे ऐश्वर्याला सांगितले आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ट्विस्ट

आता स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की हृषिकेश व ऐश्वर्या यांच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू आहेत. सर्व जण स्टेजसमोर बसून कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. ऐश्वर्या व हृषिकेशदेखील एकत्र बसले आहेत.

स्टेजवर जानकी गाणे गात आहे. साधाभोळा राजा आणि लबाड राणी असे गाण्याचे नाव आहे. तिथे सोहम व अवंतिकादेखील दिसत आहेत. तसेच पडद्यावर सारंगचा ज्या पद्धतीने अपघात घडवून आणला होता, ते सुद्धा पाहायला मिळत आहे.

तितक्यात ऐश्वर्याला सारंगदेखील दिसतो. त्याला पाहून ऐश्वर्या घाबरते. ती शेजारी बघते. तिला हृषिकेशऐवजी शेजारी जखमी अवस्थेतील सारंग दिसतो. सारंगला पाहून ती मोठ्याने किंचाळते आणि त्यानंतर चक्कर येऊन पडते. तर इतर सर्वजण तिच्याकडे पाहत असल्याचे दिसते.

हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “लबाड राणी जानकीच्या जाळ्यात अडकणार”, अशी कॅप्शन दिली आहे. आता ऐश्वर्याचे सत्य समोर येणार का? सारंग जिवंत असल्याचे सत्य ऐश्वर्याला समजणार का? तिचा खोटेपणा सर्वांसमोर आल्यानंतर रणदिवे कुटुंब तिला काय शिक्षा देणार? जानकीची आई घरी सुखरुप परतणार का? जानकी व हृषिकेश पुन्हा एकत्र येणार का? मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.