सोशल मीडियावर आता जवळपास सर्वच कलाकार बऱ्यापैकी सक्रीय असतात. आपल्या कामाबद्दलची माहिती देण्यासाठी तसंच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनेक मराठी कलाकार सोशल मीडियाचा वापर करतात. कामाबद्दलची माहिती देण्याबरोबरच अनेक मराठी कलाकार सोशल मीडियाद्वारे आपले स्टायलिश फोटो तसंच व्हिडीओही शेअर करत असतात.

सोशल मीडियावर अनेक कलाकार त्यांच्या मित्रांबरोबरचे खास व्हिडीओ शेअर करताना दिसतात. मग हे व्हिडीओ कधी एखाद्या ट्रेंडचे असतात, कधी एखाद्या प्रॅंकचे, तर कधी डान्सचे. सोशल मीडियावर अनेक कलाकार वेगवेगळ्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. कलाकारांच्या या डान्स व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो.

अशातच मराठी इंडस्ट्रीमधील अभिनेता हृषीकेश शेलार, सुशील इनामदार, अनघा अतुल आणि समृद्धी मोहरीर यांनी हिंदी गाण्यावर डान्स केला आणि याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. ‘शिकायला गेलो एक’ या नाटकातून हे कलाकार सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. याच नाटकानिमित्त ते परदेशात गेले आहेत.

‘शिकायला गेलो एक’ नाटकाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. यानिमित्ताने ते पहिल्यांदाच पर्थ या ठिकाणी गेले होते आणि या ठिकाणी जाऊन या कलाकारांनी हिंदी गाण्यावर डान्स केला. ९०च्या अतिशय गाजलेल्या ‘कहो ना प्यार है…’ या गाण्यावर हृषिकेश शेलार, सुशील इनामदार, अनघा अतुल आणि समृद्धी मोहरीर या कलाकारांनी डान्स केला.

हृषिकेश शेलार, सुशील इनामदार, अनघा अतुल आणि समृद्धी मोहरीर या कलाकारांचा ‘कहो ना प्यार है…’ या गाण्यावरील डान्स चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. तशा अनेक प्रतिक्रियासुद्धा त्यांनी या व्हिडीओखाली व्यक्त केल्या आहेत. ‘किती छान’, ‘मस्तच’, ‘सुंदर, ‘भारी’, ‘एकदम 90’s Vibe’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, ‘शिकायला गेलो एक’ या नाटकातील हृषिकेश याआधी झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत पाहायला मिळाला, तर अनघा अतुलनेही स्टार प्रवाहच्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत काम केलं आहे. शिवाय अभिनेता सुशील इनामदारनेही काही मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.