Sunny Kaushal Talks About Katrina Kaif’s Pregnancy : बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ व विकी कौशल यांनी काही दिवसांपूर्वीच ते लवकरच आई-बाबा होणार असून कतरिना गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती. अशातच आता विकी कौशलचा भाऊ अभिनेता सनी कौशलने कतरिना – विकीच्या होणाऱ्या बाळाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सनी कौशलने ‘ई टाईम्स’शी संवाद साधताना कतरिना – विकीच्या बाळाबद्दल सांगत कौशल कुटुंबात सध्या यामुळे खूप आनंदाचं वातावरण असून ते सगळेच खूप उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. सनी याबद्दल म्हणाला, “आम्ही पहिल्यांदाच असा खूप वेगळा आनंद अनुभवत आहोत. आम्ही बाळाची खूप उत्सुकतेने वाट पाहात आहोत. त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत.”

कतरिना-विकीच्या बाळाबद्दल सनी कौशलची प्रतिक्रिया

सनी कौशलला पुढे मुलाखतीत तो लवकरच काका होणार असून यासाठी तो कशी तयारी करत आहे, काका होण्याबद्दल त्याची काय प्रतिक्रिया आहे; याबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “मला खूप आनंदी असणारा, मस्ती करणारा काका व्हायचं आहे. मला बाळाचे खूप लाड करायचे आहेत, असाच काका मला व्हायचं आहे.”

विकी कौशल व कतरिना कैफ यांनी गेल्या महिन्यात इन्स्टाग्रामवर एकमेकांबरोबरचा फोटो शेअर करत ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिलेली. त्यानंतर इंडस्ट्रीतील अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. माध्यमांच्या माहितीनुसार ऑक्टोबर १५-३० दरम्यान कतरिना-विकीच्या बाळाचा जन्म होणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या जोडीने याबद्दलची कुठलीही माहिती शेअर केली नसून त्यांनी सगळ्या गोष्टी खूप खासगी ठेवण्यास प्राधान्य दिलं आहे.

कतरिनाने गरोदर असल्याची बातमी शेअर केल्यानंतर पहिल्यांदाच सनी कौशलच्या वाढदिवसानिमित्त तिने सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावलेली. त्यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सनी कौशलने इन्स्टाग्रामवर यादरम्यानचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये कतरिनाही पाहायला मिळाली; त्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.