Premium

“तू पनवती आहेस”, श्रेयस तळपदेने सांगितला मालिकेच्या ऑडिशनदरम्यानचा प्रसंग, म्हणाला, “त्यावेळी…”

श्रेयस तळपदेने सांगितला ऑडिशन दरम्यानचा अनुभव

shreyas-talpade-khupte-tithe-gupte
श्रेयस तळपदेने सांगितला ऑडिशन दरम्यानचा अनुभव. (फोटो : झी मराठी/ इन्स्टाग्राम)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शोपैकी एक म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. या शोचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या पहिल्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली होती. आता मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेला अभिनेता श्रेयस तळपदे या शोमध्ये हजेरी लावणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन ‘खुपते तिथे गुप्ते’च्या नव्या भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये श्रेयस तळपदे त्याच्या ऑ़डिशनचा एक किस्सा सांगताना दिसत आहे. “एका सिरियलच्या ऑडिशनसाठी गेलो होतो. मी बोलायला सुरुवात करणार इतक्यात कॅमेरामॅन मला ‘एक मिनिट थांब प्रॉब्लेम झालाय,’ असं म्हणाला. अर्धा तास गेला, पण त्याच्याने काहीच होईना. नाही सर, कॅमेरा परत बंद झाला, असं त्याने सांगितलं. त्यावेळी तो मला “तू पनवती आहेस” असं म्हणाला,” असं श्रेयसने सांगितलं.

हेही वाचा>> राज ठाकरेंनंतर ‘खुपते तिथे गुप्ते’च्या सीटवर उद्धव ठाकरे बसणार? अवधूत गुप्ते म्हणाला, “मी मातोश्रीवर जाऊन…”

पुढे तो म्हणाला, “माहीत नाही, असेनही कदाचित. मी त्याला काहीच बोललो नाही. कारण त्यावेळी माझ्याकडे काहीच काम नव्हतं.” ‘खुपते तिथे गुप्ते’च्या या नव्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> “मागून मिळाला तर तो सन्मान कसा?”, सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याबाबत सचिन पिळगावकरांचं वक्तव्य, म्हणाले…

‘खुपते तिथे गुप्ते’ हा शो प्रेक्षकांना दर रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. या शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजेरी लावणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 16:30 IST
Next Story
चीनच्या सीमेवर सीता बनायचे ‘शकुनी मामा’, सैन्यात जवान असलेले गुफी पेंटल अभिनयक्षेत्रात कसे पोहोचले? रंजक आहे प्रवास