Kiran Mane : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमुळे अभिनेते किरण माने घराघरांत लोकप्रिय झाले. सोशल मीडियावर ते नेहमीच सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. मात्र, त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या खास पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट किरण माने यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील एका अभिनेत्यासाठी लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, निखिल बने, दत्तू मोरे या कलाकारांना हास्यजत्रेमुळे एक नवीन ओळख मिळाली. या शोमुळे आणखी एक अभिनेता घराघरांत लोकप्रिय झाला त्याचं नाव आहे रोहित माने. याच रोहितसाठी अभिनेते किरण माने यांनी पोस्ट लिहिली आहे. किरण माने आणि रोहित हे दोघंही साताऱ्याचे असल्याने त्यांच्यात एक खास बॉण्डिंग आहे. याचा खुलासा किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.

रोहित मानेने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. याच निमित्ताने पोस्ट लिहित किरण मानेंनी आपल्या मित्राला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय या पोस्टमध्ये त्यांनी दोघांचा एकत्र सिनेमा येतोय ही आनंदाची बातमी देखील सांगितली आहे.

“रोह्या भेटल्या-भेटल्या म्हणाला होतास, “अहो किरणसर, चाहते सेल्फी काढायला येतात, तेव्हा हमखास कोणीतरी विचारतं, किरण मानेंचे तुम्ही नातेवाईक का?” मी म्हणालो… अरे मलाही विचारतात. ‘रोहित माने तुमचा कोन?’ मी सांगतो, ‘लहान भाऊ.’ रोह्या म्हणाला, “मी पण तेच सांगतो. तिथेच आमची मैत्री झाली. लवकरच अस्सल सातारी ‘माने बंधूंचा’ एक भन्नाट, जबराट, नादखुळा पिच्चर येतोय. हास्यजत्रेने मराठीला जी रत्नं दिली, त्यातल्या या अनमोल हिऱ्याला वाढदिवसाच्या लै लै लै मनापासून शुभेच्छा ! लब्यू भावा” अशी पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे.

नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत रोहितला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता या दोघांचा एकत्र सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane shares post for maharashtrachi hasya jatra fame rohit mane they both will do movie together sva 00