Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

किरण माने

अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या किरण मानेंचा (Kiran Mane) जन्म ५ एप्रिल १९७० रोजी सातारा जिल्ह्यामधील मायणी गावामध्ये झाला. शाळेमध्ये असताना अभिनय, नाटक अशा गोष्टींबद्दल त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण झाली. सातारा (Satara) पॉलिटेक्निक कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली आहे. सुरुवातीला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी गावामध्ये विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचं दुकान उघडलं. दुकानामध्ये काम करताना त्यांना अभिनयाच्या कोर्सची जाहिरात दिसली. ती पाहून मानेंही अभिनय शिकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘श्री तशी सौ’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘गोविंद घ्या गोपाळ घ्या’, ‘मनोमिलन’ अशा नाटकांमध्ये काम केले आहे.

‘स्वराज्य’, ‘ऑनड्युटी २४ तास’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले आहेत. ‘अपहरण’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते काम करत आहेत. लिहण्याची आवड असणारे किरण माने सोशल मीडियावर फार व्यक्त होत असतात. त्यांनी लिहिलेल्या एका पोस्ट्समुळे ते चर्चेत आले होते. याच दरम्यान त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून काढण्यात आले. फेसबुक पोस्टमुळे मालिकेमधून काढल्याचे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये म्हटले.

या प्रकरणामुळे ते खूप चर्चेत आले होते. त्यानंतर किरण मानेंनी बिग बॉस (Bigg Boss)मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये सहभाग घेतला. ते या पर्वामध्ये उपविजेते ठरले.
Read More
Kiran Mane Post About Tukaram Maharaj
किरण माने यांची आषाढीच्या निमित्ताने पोस्ट, “आपला तुकोबाराया विठ्ठलामध्ये गौतम बुद्धाला बघत होता…”

अभिनेते किरण माने हे त्यांच्या खास पोस्टसाठी चर्चेत असतात, सोशल मीडियावर आज त्यांनी तुकाराम महाराजांचं महत्त्व सांगणारी पोस्ट लिहिली आहे.

What Kiran Mane Said in his Post?
किरण माने यांची पोस्ट चर्चेत, “ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं बहुजनांना ‘पाप पुण्या’ची भीती दाखवून…”

किरण माने यांनी संत सेना न्हावी यांचे अभंग पोस्ट करत ब्राह्मण्यवादावर भाष्य केलं आहे.

Kiran Mane Post On Waari
किरण मानेंची पोस्ट, “संतांनी टाईमपास म्हणून वारी सुरु केली नव्हती, खतरनाक विद्रोह…” प्रीमियम स्टोरी

अभिनेते किरण माने यांनी वारी संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. ज्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होते आहे.

What Kiran Mane Said in his Post ?
किरण मानेंची पोस्ट, “आजही पूर्वीप्रमाणेच तुकोबा आणि अनगडशा फकीर एक झाले, तर अनेक कारस्थान्यांच्या..”

तुकाराम महाराज हे खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी होते असंही किरण मानेंनी म्हटलं आहे.

Kiran Mane play new role in new marathi serial tikali
‘सिंधूताई माझी माई’नंतर किरण माने झळकणार ‘या’ नव्या मालिकेत, म्हणाले, “अत्यंत निर्दयी, क्रूर…”

अभिनेते किरण मानेंची नवी मालिका कधीपासून सुरू होणार जाणून घ्या…

What Kiran Mane Said?
किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत! “ज्या अपयशापासून पळून जाण्यासाठी सत्ताधारी ‘हिंदुत्व’ शब्दाचा..”

अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन करताना छोटसं भाषण केलं होतं. त्याचाच संदर्भ देत किरण मानेंनी पोस्ट लिहिली आहे.

Kiran Mane Post About Shahu Maharaj
“तुम्ही जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, लायकी..”, शाहू महाराजांबाबत किरण मानेंनी केलेली पोस्ट व्हायरल

अभिनेते किरण माने यांनी शाहू महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे.

Kiran Mane Post About Narendra Modi
मोदी-राहुल गांधींचं लोकसभेत हस्तांदोलन आणि किरण मानेंची पोस्ट; “दुश्मनी जम के करो लेकिन ये गुंजाईश…”

अभिनेते किरण माने यांनी आज राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींच्या भेटीच्या या फोटोवर एक पोस्ट केली आहे जी चर्चेत आहे.

Kiran Mane Post About Narendra Modi
किरण मानेंचा टोला, “राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना संविधान दाखवलं, पडलेल्या चेहऱ्याने डोळे..”

किरण माने यांनी एक मोठी पोस्ट लिहून नरेंद्र मोदींंविरोधात टोलेबाजी केली आहे.

What Kiran Mane Said About Ram Temple?
पहिल्याच पावसात राम मंदिराला गळती, किरण मानेंची केंद्र सरकारवर टीका; “लाज शिल्लक असेल तर…”

अयोध्येतील राम मंदिराला पावसामुळे गळती लागली आहे ही माहिती मुख्य पूजारी सत्येंद्र दास यांनी दिली.

संबंधित बातम्या